Disqualification extended till March 18 : अमरावती शिक्षक बँक संचालक प्रकरणात न्यायालयाचा दिलासा
Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी ७ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावली होती. त्यानुसार, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता स्वतः किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याची संधी त्यांना देण्यात आली होती. मात्र, बच्चू कडू यांनी १० मार्चपर्यंत मुदत मागितली.
विभागीय सहनिबंधकांनी ही मुदत मंजूर केली होती. तरीही, आणखी वेळ मिळावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना अखेरची संधी देत आठ दिवसांची मुदतवाढ दिली असून, १८ मार्च रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. बबलू देशमुख गटातील संचालक हरीभाऊ मोहोड व अन्य ११ संचालकांनी बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
Ravikant Tupkar : अरबी समुद्रात शेतकऱ्यांचा सातबारा बुडवणार!
या याचिकेत, नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात बच्चू कडू यांना एका वर्षाची शिक्षा सुनावल्याचा दाखला देण्यात आला आहे. बँकेच्या उपविधीनुसार, एका वर्षाहून अधिक शिक्षा झालेल्या व्यक्तीला संचालक पदासाठी अपात्र ठरवले जाते. याच नियमाचा आधार घेत विभागीय सहनिबंधकांनी “आपणास अपात्र का ठरवू नये?” अशी नोटीस पाठवली होती.
Ajit Pawar : देशातील ७० टक्के पनीर कृत्रीम, अजित दादा म्हणाले..
बच्चू कडू यांनी २४ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी मुदत मागितली होती, जी १० मार्चपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, त्यांनी आणखी वेळ मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने त्यांना १८ मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली असून, पुढील सुनावणीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.