Farmers’ Dialogue Meeting on September 19 in Akola : राकेश टिकैत, बच्चू कडू यांची उपस्थिती राहणार
Akola शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आणि कर्जबाजारीपणामुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या संकटावर उपाय शोधण्यासाठी ‘शेतकरी लूटवापसी संवाद सभा’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अकोल्याजवळील कान्हेरी येथे १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत होणार असून, किसान ब्रिगेडच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या संवाद सभेला भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू, किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे, शेतकरी संघटनेचे ललित बहाडे, वामनराव चटप, संयुक्त किसान मोर्चाचे अजित नवले, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, तसेच शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Case of illegal birth certificates : बेकायदेशीर जन्मदाखल्यांवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
देशभरातील प्रमुख शेतकरी नेतेदेखील या परिषदेत सहभागी होणार असून त्यामध्ये किसान सभेचे अशोक ढवळे, अजय भगत, शेतमजूर संघाचे अनिल त्यागी, व्ही. कोटेश्वर राव, तराई किसान युनियनचे तेजिंदरसिंग विर्क, तसेच शेतमजूर संघटनेचे व्यंकन्ना यांचा समावेश आहे.
तयारी अंतिम टप्प्यात
ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रांताध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, कार्याध्यक्ष शरद वानखेडे, तसेच भगवंतराव गवळी, प्रदीप गावंडे, राजेश मावळे, गंगाधर महाराज, दादाराव पार्थीकर, नितीन मोहोळ, साहेबराव मोरे, गजानन अहमदाबादकर, कृपाल तयाता, पांडुरंग पाटील, भगवान इंगोले, रमेश पंतीगे, विजयकुमार नवघरे आणि शिवराम पाटील हे प्रयत्नशील आहेत.
Education Department : विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवली, मग शिक्षकांची नियुक्ती झाली
शेतकरी चळवळीत सक्रिय असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी शेतीचे प्रश्न मनापासून समजून घेण्यासाठी या परिसंवादाला उपस्थित राहावे, असे आवाहन किसान ब्रिगेडचे प्रवक्ते धनंजय मिश्रा आणि जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे यांनी केले आहे.








