Bacchu Kadu : विरोधक चुकीचे वागले म्हणून मी अध्यक्ष झालो, अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे

Profit roadmap presented at the annual general meeting of the district bank : बच्चू कडूंचा टोला, जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत मांडला नफ्याचा रोडमॅप

Amravati “विरोधकांच्या चुकीच्या वागण्यामुळेच मी आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आहे. अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे आहे आणि यशस्वीपणे बँकेचे कामकाज चालू आहे. त्यामुळेच विरोधकांकडून वारंवार कारवाया केल्या जात आहेत. मात्र बँक आज प्रगतीच्या मार्गावर असून शेतकऱ्यांसाठी आम्ही सातत्याने लढत आहोत,” असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झालेल्या जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कडू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हा आमचा ध्यास आहे; पण बँकेतील विरोधी संचालक मात्र केवळ राजकारण करण्यात गुंतलेले आहेत,” असे ते म्हणाले.

Dussehra gathering : पूरग्रस्तांना दिलासा, उद्धव ठाकरेंना टोला आणि मोदींचं कौतुक !

या सभेचे अध्यक्षस्थान कडू तर सहअध्यक्षस्थान उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी भूषविले. सभेला संचालक नरेशचंद्र ठाकरे, आनंद काळे, जयप्रकाश पटेल, अजय मेहकरे, सुनील वऱ्हाडे, बाळासाहेब आळोणे, चित्रा डहाणे, सुरेखा ठाकरे, मोनिका मार्डीकर आदी संचालक उपस्थित होते. मात्र विरोधी गटातील नऊ संचालक गैरहजर राहिले. बबलू देशमुख यांच्या गटाने मागील सभेला नियमबाह्य ठरवत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्यांचा गट या सभेत मोठ्या प्रमाणावर अनुपस्थित राहिला.

कामगिरीचा आढावा देताना कडू म्हणाले की, “कर्जवाटपात १६५ टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या ठेवींमध्ये १९७ कोटींची भर पडून एकूण ठेवी २३०० कोटींवर पोहोचल्या आहेत. शेअर भांडवल ३ हजार कोटींपर्यंत गेले आहे. याशिवाय ४९ कोटींचे इतर कर्ज वितरित करण्यात आले असून बँक नफ्यात आहे. गावपातळीवरील सोसायट्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”

उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनीही विरोधकांवर आरोप करताना, “बँकेच्या कामकाजात अनावश्यक अडथळे आणले जात आहेत. यापुढे सर्व ठराव थेट सर्वसाधारण सभेतूनच मंजूर करून घेऊ,” असे स्पष्ट केले.

Thackeray brand : राज आणि मी एकत्र राहण्यासाठीच एक झालो आहोत !

या सभेत विषयसुचीवरील सात ठराव मंजूर करण्यात आले. त्यात ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मान्यता, २०२४-२५ मधील अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी, २०२५-२६ चे अंदाजपत्रक मंजुरी, भागभांडवल वाढविण्याचा ठराव, संधी लेखापाल अहवाल व दोषदुरुस्तीचा आढावा, नवीन संधी लेखापरीक्षकाची नियुक्ती, तसेच अनुकंपा भरतीस मान्यता यांचा समावेश होता. सभेत नुकसानग्रस्तांना मदत व वादग्रस्त ठरलेल्या भेटवस्तूंचा मुद्दाही उपस्थित झाला. त्यावर सर्वानुमते सदस्यांना भेटवस्तू घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला.