Bachchu Kadu criticizes NCP chief Ajit Pawar : स्वतःच्या पक्षातही त्यांचे काही चालत नाही
Amravati : माणिकराव कोकाटे यांचा गेम कुठे फसला, हे माहिती नाही. कदाचित कोकाटेंकडे अजित पवारांच्या काही सिक्रेट गोष्टी असतील. त्यामुळे दादा कारवाई करण्याचे धाडस दाखवत नसावे. तसेही दादांची ‘दादागिरी’ आता सरकारमध्ये चालत नाही आणि सद्यस्थिती पाहता त्यांच्या पक्षामध्येही चालत नाही. त्यांच्याच पक्षात त्यांचं कुणी ऐकत नाही, असं दिसतंय, असे म्हणत माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले आहे.
अमरावती येथे आज (२९ जुलै) बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ऑपरेशन महादेवबद्दल विचारले असता ते म्हणाले, धर्माचे नाव देऊन २८ लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली जाते. मात्र सहा लाख शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत, त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही. देवी-देवतांचे नाव वापरून त्यांना लोकांना केवळ धर्मामध्ये गुंतून ठेवायचे आहे. तो महादेवाचा त्रिशूल सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या छाताड्यात खूपसायचा आहे, अशी अवस्था सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे.
Cabinet reshuffle : मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेत शिंदेंच्या ‘ या’ शिलेदाराचे नाव
सहा लाख हिंदू आया – बहीणींचा सिंदूर उधळला गेला, तेव्हा मोदी आणि फडणवीस बोलायला तयार नाहीत. साधी श्रद्धांजली द्यायलासुद्धा तयार नाहीत. त्यामुळे असे नवीन नवीन प्रकार केले जात आहेत. २८ लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली, ते मान्य आहे. पण सहा लाख शेतकऱ्यांनी पाय घासून घासून आत्महत्या केली, त्याच्यासाठी त्यांना सिंदूर आठवत नाही. हे सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव काय असणार, असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.