Breaking

Bachchu Kadu : हम चलते तो चिते की रफ्तार से, रोकने की तुम्हारी औकात नहीं !

Bachchu Kadu attacked on Government : बच्चू कडू यांनी पुन्हा सरकारवर साधला निशाणा

Amravati बच्चू कडू यांनी बैलजोडीचा वेग आणि भाषणाच्या जोरावर विरोधकांना चांगलंच घायाळ केलं. “ही ५६ इंचाची छाती नाही, तर शेतकऱ्यांच्या मुलाची छाती आहे,” असं त्यांनी सांगितलं. “हम चलते तो चिते की रफ्तार से चलते, रोकने की तुम्हारी औकात नहीं,” या शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

विदर्भातील सर्वात मोठ्या बहिरम बाबा यात्रा महोत्सवात प्रहार जनशक्ती पक्षाच्या विदर्भ केसरी शंकरपटाचा समारोप गुरुवारी झाला. या समारोपात बच्चू कडू यांनी गोविंदा आणि शिवा या त्यांच्या बैलजोडीसह शर्यतीत भाग घेतला आणि ६.९९ सेकंदांत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, या शर्यतीत बच्चू कडू यांचा बैलगाडा जितका वेगवान होता, तितकंच त्यांचं भाषणही सुसाट होतं.

Birth-death certificate irregularity : जन्म नोंदीसाठी प्राप्त अर्जाची छाननी करा !

लाखो प्रेक्षकांचा जल्लोष
या शंकरपटाला लाखो प्रेक्षक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. २१ ते २३ जानेवारीदरम्यान हा शंकरपट आयोजित करण्यात आला होता. समारोपाच्या दिवशी आयोजित बैलगाडा शर्यतीत ४०० हून अधिक धुरकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील विजेते
शंकरपटातील ‘अ’ गटात जांभळी येथील मोहसीन पटेल यांच्या देवाभाई-महिप्या बैलजोडीने ६.४९ सेकंदात अंतर कापत प्रथम क्रमांक पटकावला. बैतुलच्या मिसाईल-देवा जोडीने ६.५२ सेकंदात द्वितीय, तर अमरावतीच्या महाराज-काशी जोडीने तृतीय क्रमांक मिळवला. ‘क’ गटात बुलढाण्याच्या भीमा-लाडक्या जोडीने ६.४९ सेकंदांत विजय मिळवला. विजेत्या स्पर्धकांना दुचाकी व रोख बक्षिसांनी गौरवण्यात आलं.

CEO Nagpur : नागपूर जिल्हा परिषदेतील गैरप्रकारावर सीईओंचा हंटर !

बच्चू कडू यांची कामगिरी आणि शेतकरीप्रेम
बच्चू कडू यांनी शर्यतीत ६.९९ सेकंदांत अंतर कापून विजेतेपद मिळवलं. त्यांच्या बैलजोडीने ७.१२ सेकंदांचा आधीचा विक्रम मोडला. त्यांच्या शेतकरीप्रेमाची झलक केवळ त्यांच्या भाषणात नव्हे, तर त्यांच्या कृतीतूनही दिसून आली. या वेळी संतोष किटुकले, सुरेश गणेशकर, राजेश सोलव, प्रशांत आवारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.