Breaking

Bachhu Kadu Hunger Strike: काहीही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच

Bachchu Kadu food boycott movement begins :अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा निर्धार

Amaravati : शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ, शेतकऱ्यांना कर्जमाफी, आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक, माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ या आंदोलनाची सुरुवात होत आहे.

अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत 20 हजार शेतकरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही.’

US: अमेरिकेत आणखी एका शहरात हिंसाचार,118 जणांना अटक

बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर मच्छीमारांसाठी हे आंदोलन करत आहे. यासंदर्भात शासनाकडून आश्वासन मिळाले होते. परंतु त्याची पुर्तता झाली नाही. आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही. शेतमालांचे भाव पडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे. घरकुलाचा मुद्दा आहे. मच्छीमारांचा, मेंढपाळ यांचा मुद्दा आहे. अनेक वेळा पत्र देऊनही मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

दिव्यांगाना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार करत बच्चू कडू म्हणाले की, अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहेत. परंतु दिव्यांगांचा निधी वेळेवर मिळत नाही. निराधारांचे पगार वेळेवर होत नाही. सरकार जाणीवपूर्वक मुद्द्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही.

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ठाकरेंचा हा कौटुंबिक विषय आहे. मुद्दे घेऊन ते एकत्र झाले तर फार चांगले होईल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका घरातील आहे, म्हणून एकत्र येऊ नये, तर मुद्द्यांवर एकत्र आले पाहिजे. मुंबई वाचवणे फार महत्त्वाच आहे.

Water Council in Nagpur : भाकित खरे ठरले, पाण्यासाठी युद्धाचे दिवस आले !

महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखाबद्दल बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ईव्हीएम मशीन हे खरे पाहिले तर काँग्रेसचे पाप होते. त्यांनी बी पेरले. काँग्रेसच्या त्या बियाला विषारी फळ भाजपने लावले आहे. त्याचे हे परिणाम आहे. ईव्हीएम मशीनने लोकशाहीला घाला घातला आहे. खून करण्याचे काम भाजपने केले आहे

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.