Nana Patekar, Bachhu Kadu : नाना पाटेकरांच्या साथीने बच्चू कडूंचा ‘प्रहार’!

Bachu Kadu is now in social work with Nana Patekar meet at pune : समाजकार्यात उतरण्याचा निर्धार; दिव्यांगांसाठी आंदोलन

Nana Patekar दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर बच्चू कडू आता पूर्णवेळ समाजकार्य करणार आहेत. दिव्यांगांसाठी आंदोलन करण्यासह विविध विषयांवर ते सरकारला जाब विचारणार आहेत. मात्र, समाजकार्याच्या पुढच्या प्रवासात ते सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकरांसोबत काम करणार आहेत. त्यामुळे बच्चू कडूंच्या या निर्णयाची केवळ राजकारणात नव्हे तर चित्रपटसृष्टीतही चर्चा होऊ लागली आहे.

महाराष्ट्रामध्ये शेतकरी, गरजवंत लोकांसाठी झटत असलेल्या संस्थांची मोट बांधायची. आणि राज्यभरात विविध प्रकल्प उभारण्याची योजना प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी आखली आहे. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. एका छताखाली सर्व संस्थांना घेऊन बहुउद्देशीय प्रकल्प हाती घेण्याचे प्राथमिक नियोजन केले आहे.

आमदार असताना कामाच्या व्यापामुळे गरजवंतासाठी काम करणे शक्य झाले नाही. जनहिताच्या मोठ्या योजना देशातील नामांकित संस्थांच्या साथीने उभारण्यात येतील. या योजना पूर्णत्वास नेण्याची योजना आखण्यात आली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. पुण्यातील प्रहार रुग्णसेवकाच्या एका हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त बच्चू कडू गेले होते. त्यावेळी अभिनेते नाना पाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी भेट दिली. तासभर विविध विषयांवर चर्चा केली. स्वामिनाथन आयोगापासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

Praful Patel : दोन राष्ट्रवादी एकत्र येणे हा कौटुंबिक विषय !

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या दर्जेदार मालाला योग्य भाव मिळून देण्याचा उद्देश आहे. त्यादृष्टीने थेट शेतकरी ते ग्राहक तसेच मागणी तसा पुरवठा तत्त्वावर मोठ्या शहरांमध्ये प्रयोग राबविता येतील का, यावर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील व राज्याबाहेरील संस्थांना एकत्र आणण्याचा त्यांचा विचार आहे. शेतकरी, पाणी, माती, पशुसंवर्धन यांच्या संरक्षणार्थ काम करायचे आहे. गावखेड्यांतील अपंग, दिव्यांग, विधवा, परितक्त्या, गरजवंत एकल महिला तथा महिला बचत गटांच्या उद्यमशील महिलांना शेळी गटाचे वाटप करायचे. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे. तसेच गरजवंतांकरिता नाममात्र पैशामध्ये महागड्या सुविधा उपलब्ध करवून द्यायच्या, यावरही चर्चा करण्यात आली.

नाना-बच्चू जोडी ठरणार हिट
पडद्यावरील अभिनयात हिट ठरलेले नाना पाटेकर समाजकार्यातही आघाडीवर आहेत. नाना पाटेकर आणि बच्चू कडू यांची काम करण्याची पद्धत सारखीच आहे. दोघेही आक्रमक भूमिक घेतात. महत्त्वाच्या विषयावर सरकारच्या विरोधात जाण्याची तयारी ठेवतात. त्यामुळे नाना-बच्चू ही जोडी राज्यात चांगलीच हिट ठरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.