Bachu Kadu : बच्चू कडूंचा धमकीवजा इशारा : “आता थेट कलेक्टरलाच तोडू”

Tupkar says, There is no justice without trampling on two or three ministers : तुपकर म्हणतात, दोन-तीन मंत्र्यांना तुडवल्याशिवाय न्याय नाही !

Akola : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अकोल्यात झालेल्या शेतकरी संवाद सभेत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.

कडू यांनी आक्रमक भाषेत इशारा देत म्हटले “जळगावात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडले. पण यापुढे आंदोलन झालं तर थेट कलेक्टरलाच तोडू!” त्यांच्या या धमकीवजा विधानामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

त्याच सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आणखी आक्षेपार्ह विधान केले. “नेपाळमध्ये जशी व्यवस्था दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय जागी झाली, तशीच इथंही होईल. शेतकऱ्यांना न्याय मिळवायचा असेल तर दोन-तीन मंत्र्यांना तुडवल्याशिवाय पर्याय नाही,” असे तुपकरांनी थेट भाष्य केले.

Ajit Pawar : ..आणि म्हणून मी सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो !

या विधानांमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. सरकारवर आधीच शेतकरी मदतीच्या मुद्यावर दबाव असताना, अशा आक्रमक इशाऱ्यांनी आंदोलन पेट घेण्याची शक्यता आहे.

सभेत उपस्थित असलेल्या भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी शेतकऱ्यांना शांततेचा सल्ला देत “शेतकरी कुठल्याही परिस्थितीत आपली जमीन विकू नका” असे आवाहन केले. त्यांनी शेतकरी कर्जमाफी, पिकांना हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.

डॉ. अजित नवले यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत म्हटले, “राज्यभर पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. तरी सरकार पंचनामे करायला तयार नाही, मदत तर दूरच राहिली. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. तातडीने निर्णय घ्या, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष आवरणं अशक्य होईल.”

Ajit Pawar : अजित पवारांचा इशारा मंत्रिपदासाठी कामगिरी दाखवा !

बच्चू कडूंच्या थेट धमकीने आणि तुपकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, शेतकरी आंदोलन आता आणखी आक्रमक वळण घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.