Badlapur Crime : भाजप कार्यकर्त्यांकडून ‘शिंदे’ गटाच्या नगरसेवकाला बेदम मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

BJP workers brutally assault a corporator from the Shinde group : हेमंत चतुरे रक्ताच्या थारोळ्यात; म्हसकर पिता-पुत्रासह तिघांना बेड्या

Badlapur राज्यात महायुतीचे सरकार असतानाही स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. बदलापूरमध्ये माघी गणेशोत्सवाच्या दरम्यान ‘शिंदे’ गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चतुरे गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणामुळे बदलापूरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली भागातील ‘आत्मीय हाईट्स’ येथील गणेश मंडळात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. हेमंत चतुरे हे बाप्पाच्या दर्शनासाठी गेले असताना, भाजप पदाधिकारी तेजस उर्फ बंटी म्हसकर आणि त्यांच्या समर्थकांशी त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि म्हसकर समर्थकांनी चतुरे यांना लाथाबुक्क्यांनी आणि इतर वस्तूंनी बेदम मारहाण केली. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजपची मोठी नाचक्की झाली आहे.

Shiv Sena symbol : “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” शिवसेना पक्ष–चिन्ह प्रकरणावर पुन्हा आक्षेप

या हल्ल्यामागे महापालिका निवडणुकीतील जुन्या वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत बंटी म्हसकर यांच्या पत्नीने हेमंत चतुरे यांचा पराभव केला होता. मात्र, चतुरे यांना शिवसेनेने ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून महापालिकेत पाठवल्याने म्हसकर गट नाराज होता. वालिवली आणि सोनिवली भागात वर्चस्व कोणाचे, यावरून दोन्ही गटात गेल्या काही दिवसांपासून धूसफूस सुरू होती, ज्याचा शेवट या हिंसक घटनेत झाला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी तेजस (बंटी) म्हसकर, त्याचे वडील योगेश म्हसकर आणि सागर म्हसकर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींविरुद्ध मारहाण आणि दंगल घडवल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrapur Congress : चंद्रपूरात काँग्रेसची अवस्था, ‘आधे उधर जावो, आधे इधर आओ’

सार्वजनिक सणांच्या काळात अशा प्रकारे राजकारण्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबल्याने बदलापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “युतीचे सरकार असूनही जर सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते एकमेकांचे रक्त सांडत असतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.