Breaking

Balwant Wankhede Yashomati Thakur : काँग्रेसचा जनता दरबार, पण समस्या कोण सोडवणार?

Congress held a public meeting : बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांच्याकडे आली निवेदने

Amravati सत्ताधारी आमदार-मंत्र्यांनी घेतलेल्या जनता दरबारात लोक पोहोचतात. त्यातल्या अर्ध्याही समस्या सुटत नाहीत. त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काँग्रेसचेही नेते जनता दरबार भरवत आहेत. मात्र, त्यांनी सरकारपुढे मांडलेल्या समस्या खरच सुटतील का, अशी नागरिकांच्या मनात आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार अर्ज, तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने शेकडो नागरिकांनी काँग्रेसच्या जनता दरबारात आपली व्यथा मांडली. खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आणि शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांशी तातडीने संपर्क साधला.

Caste wise census : जातिनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक न्याय, हक्काची पुनर्स्थापना !

अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी सकाळी ९ वाजल्यापासून जनता दरबारास सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी काँग्रेस भवनात आयोजित दुसऱ्या सत्रातही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. वीज वितरण, कृषी, महसूल, आरोग्य विभागासह विविध शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी नागरिकांनी मांडल्या.

शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला, विद्यार्थी अशा सर्वच वर्गातील लोकांनी दरबारात आपल्या अडचणी मांडल्या. अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीच्या संधी, शासकीय भरतीबाबत समाधान मागितले. तलाठी भरती व अन्य विभागातील रखडलेली भरती ही नागरिकांच्या संतापाचा मुख्य विषय ठरली.

Congress : नृसिंहाप्रमाणे ईव्हीएममधून नवा अवतार भाजपला नष्ट करेल !

नागरिकांच्या व्यथा ऐकून खासदार वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी काही अधिकाऱ्यांशी थेट फोनवरून संपर्क साधला. संबंधित विभागांकडे तातडीने पाठपुरावा करून समस्यांचे निवारण करण्याची ग्वाही दिली. सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून वाट पाहणाऱ्या नागरिकांची अपेक्षा पुन्हा जागी झाल्याचे चित्र दरबारात दिसले.