Protest on September 25 for ST reservation : एसटी आरक्षणासाठी २५ सप्टेंबरला एल्गार मोर्चा
Buldhana बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात एल्गार मोर्चे काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’चा नारा देत भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा समाजनेते अॅड. संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार भवनात २१ सप्टेंबर रोजी बोलताना राठोड म्हणाले की, “१० जानेवारी १९५० रोजी सीपी अॅण्ड बेरार सरकारने बंजारा समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यास सांगितले होते. तसेच १८७१ ते १९३१ च्या जनगणनेनुसार बंजारा हा स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंदला गेला आहे. त्यामुळे एसटी आरक्षण आमचा घटनादत्त अधिकार आहे. कुणाचे आरक्षण काढून आम्हाला द्या असे आम्ही म्हणत नाही; पण एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय बंजारा समाज शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
OBC Reservation : आमरण उपोषण सुरूच राहणार, पाठिंब्याच्या पत्रांचा ओघ
ते पुढे म्हणाले, “बंजारा समाज हा स्वातंत्र्योत्तर काळापासून वाड्या, वस्त्या, जंगलामध्ये राहणारा आदिवासी समाज आहे. तेलंगणात तो एसटी, कर्नाटकात एससी, तर इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट आहे. महाराष्ट्रात मात्र न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता बांधवांनी जिल्ह्याजिल्ह्यात एल्गार पुकारला आहे.”
Manikrao Kokate : मिटकरी माझे ‘गुरु’, बोलणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात
२५ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील मोर्चात हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राठोड यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला अभय चव्हाण, जंगलसिंग राठोड, रोहिदास चव्हाण, विनायक राठोड, लक्ष्मण नाईक, भारत राठोड, उमेश राठोड, गुलाबराव राठोड, राजेश राठोड, भूपेश जाधव, साहेबराव चव्हाण, विठ्ठल चव्हाण, भुजंग सर आदींची उपस्थिती होती.








