Ex-deputy mayor arrested from house : पोलिसांनी घरातून उचलले; साडेतीन कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकरण
Nagpur पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते, नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर व विद्यमान काँग्रेस नेते छोटू (रवींद्र) भोयर यांना अटक करण्यात आली आहे. एका बँकेतील साडेतीन कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी भोयर यांना त्यांच्या राहत्या घरी धडक देऊन ताब्यात घेतले.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी रेशीमबाग येथील घरुनच त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने २५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. भोयर यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Educational Quality Conference : शिक्षकांचे काम म्हणजे उद्योगधंदा नाही !
रवींद्र भोयर २०१९ मध्ये पुनम अर्बन क्रेडीट को ऑप. सोसायटीत संचालक होते. त्यावेळी ग्राहकांना भरघोस लाभ आणि परताव्याचे आमिष देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. जवळपास शंभराच्यावर ग्राहकांनी तीन कोटी ४१ लाख रुपये गुंतविले. बराच कालावधी लोटल्यानंतरही त्यांना गुंतवणुकीचा लाभ मिळाला नाही.
विचारपूस करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ठोस उत्तर मिळत नव्हते. अखेर त्रस्त झालेल्या ग्राहकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संचालक मंडळातील सदस्यांना अटक केली. आतापर्यंत दहा आरोपींना अटक झाली आहे. मात्र, रवींद्र भोयर यांना पोलिसांनी हात लावला नव्हता. आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर बुधवारी सकाळीच अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सखोल चौकशी करीत आहेत.
Navoday Students : ११,५३६ विद्यार्थ्यांनी दिली ‘नवोदय’ची निवड चाचणी परीक्षा
मोठी राजकीय कारकीर्द
रवींद्र भोयर यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. ते 15 वर्ष नागपूर महानगर पालिकेत नगरसेवक होते. या काळात त्यांना भाजपने उपमहापौर केले. नागपूर सुधार प्रन्यासचे ते विश्वस्तही होते. विशेष म्हणजे त्यांचा संघ परिवाराशी जवळचा संबंध होता. दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपकडे दक्षिण नागपुरमधून विधानसभा लादण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यात त्यांना यश आले नाही. नंतर विधानपरिषदेसाठी देखील ते इच्छुक होते. तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली होती. अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि बावनकुळे यांच्या विरोधात उमेदवारी मिळवली. पण या निवडणुकीत काँग्रेसनेच रवींद्र भोयर यांच्या विरोधात व्हिप जारी केला.