Breaking

Banking sector : बॅंकिंग क्षेत्रातील मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचे काम उटगी करतील !

Congress state president Harshvardhan Sapkal has faith in Viswas Utgi : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विश्वास

Mumbai : केंद्र व राज्यात भाजप सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. बॅंकींग क्षेत्रातही भाजपवाल्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. काही भांडवलदार कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेले. पण भाजप सरकारने अद्यापही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. आर्थिक पातळीवरही भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आता बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी बॅंकींग आणि आर्थिक क्षेत्रातील मुद्द्यांवर आवाज उठवून झोपलेल्या सरकारला जागे करणाचे काम विश्वास उटगी करतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई येथील गांधी भवनमध्ये काल (ता. २७) बॅंकींग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. सपकाळ यांनी उटगी यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्यावर उपरोक्त जबाबदारी सोपवली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. गेल्या ४० वर्षांपासून विश्वास उटगी बॅंकींग क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सातत्याने सरकारला जाब विचारण्याचे काम करत आहेत. आता हेच काम ते अधिक वेगाने करतील, असा विश्वास अतुल लोंढे यांनी व्यक्त केला.

Modi Government : संपूर्ण जगाला ‘सिंदूर’चा अर्थ आणि महत्व समजलं !

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारची कारकिर्द पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यांच्यामुळे राज्याचे आर्थिक निर्देशक देशातील सर्वात वाईट स्थितीत आले आहेत. भारत हा मुळात कृषीप्रधान देश आहे. या देशातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा उदरनिर्वाह याच क्षेत्रातून होतो. पण सरकारच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांना अगदी सामान्य गोष्टींसाठीही आंदोलने करावी लागतात, रस्त्यांवर उतरावे लागते. भाजपने बॅंकींग क्षेत्रात घालून ठेवलेल्या गोंधळामुळे शेतकरी त्यांच्या हक्कांपासून वंटित राहात आहेत, असेही यावेळी मान्यवरींनी नमूद केले.