Breaking

Banned Tobacco worth Rs 1 crore seized : प्रतिबंधित तंबाखूची तस्करी उधळली !

 

Smuggling of banned tobacco busted : इलेक्ट्रिक साहित्याआड सुरू होता प्रकार; एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wardha दिल्लीवरून मुंबई येथे कंटेनरमधून इलेक्ट्रिक साहित्याच्या आडून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी सुरू होती. ही तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावली. सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.

Bunty Shelke Congress : शेळकेंच्या आंदोलनाला ‘काँग्रेस’ची दांडी !

पोलिसांनी शाहीद ईलियास, हाकमखान शाकीरखान यांना अटक केली. दीपक ट्रान्सपोर्टचे मालक, विकास छाबडा, कंटेनर मालक अशिना विकास छाबडा यांच्यावरही गुन्हा दाखल केला. समृद्धी महामार्गावरून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचला. दिल्लीकडून कंटेनर येत होता. पोलिसांनी कंटेनरला थांबवून पाहणी केली.

त्यात समोरील भागात इलेक्ट्रिक साहित्य आणि जोडे होते. मात्र, मधात ७० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू लपवून असल्याचे आढळले. पोलिसांनी सुगंधित तंबाखूसाठा आणि कंटेनर, असा एक कोटी सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Nagpur RTO : चारशे रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्याला अटक !

ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, राहुल इंटेकार, बालाजी लालपालवाले, नरेंद्र पाराशर, मनीष श्रीवास, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, अमोल नगराळे, नितीन ईटकरे, गोपाल बावणकर, सागर भोसले, मंगेश आदे, दीपक साठे, मिथुन जिचकार, प्रफुल्ल पुनवटकर यांनी केली.

कंटेनरमध्ये इलेक्ट्रिक वायर
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये पाळत ठेवली. कंटेनरला थांबवून चालकाला विचारणा केली. चालकाने बोअरिंगचे साहित्य, जोडे, इलेक्ट्रिक वायर असल्याचे सांगितले. पावत्याही दाखवल्या. त्यात एक पावती मुंबई आणि दुसरी तामिळनाडू येथील सेलस येथील होती. कंटेनरची तपासणी केली असता साहित्याच्या मधात तंबाखूसाठा लपवलेला आढळला. आता पोलिस ज्या कंटेनरमधून तंबाखू तस्करी सुरू होती, तो समृद्धी महामार्गावरून कितीदा गेला, याचा तपास करणार आहे.