व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Baramati byelection : बारामती पोटनिवडणुकीत अखेर ३० उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

Baramati byelection : बारामती पोटनिवडणुकीत अखेर ३० उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

baramati-byelection-congress-withdrawal-30-candidates-out-23-in-fray : अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा यांच्यासह २३ जण रिंगणात कायम

Pune: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून काँग्रेससह तब्बल ३० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

बारामती पोटनिवडणुकीसाठी एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी २४ जणांनी अर्ज मागे घेतले, तर यापूर्वी सहा उमेदवारांनी माघार घेतली होती. अशाप्रकारे एकूण ३० उमेदवार निवडणुकीतून बाहेर पडले असून आता २३ उमेदवार मैदानात उरले आहेत.

Devendra fadnavis : नोकरीचे आमिष, लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव!

दरम्यान, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसच्या माघारीनंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार निवडणुकीत कायम राहिले आहेत.

काँग्रेसकडून अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माघारीची घोषणा करताना सुनेत्रा पवार यांनी फोनद्वारे विनंती केल्याचे तसेच रोहित पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेतल्याचे सांगितले. याशिवाय शरद पवार यांच्या सूचनेचाही उल्लेख करत काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Vanchit Bahujan Aghadi : महात्मा फुले यांच्या खानवडीत ‘कंपनी राज’चा आरोप

आता बारामतीत २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया ६ मेपर्यंत पूर्ण होणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग येणार असून सर्व पक्षांनी ताकद लावण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राजकीय चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

_

error: Content is protected !!