व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Baramati bypoll : सुनेत्रा पवारांच्या अर्जावेळी पुरुष नेत्यांची गर्दी, मात्र केवळ तीन...

Baramati bypoll : सुनेत्रा पवारांच्या अर्जावेळी पुरुष नेत्यांची गर्दी, मात्र केवळ तीन महिला नेत्या !

sunetra-pawar-nomination-baramati-bypoll-2026-leaders-present : शिंदे, बावनकुळे, भुजबळ, मुंडे यांची हजेरी

Baramati: बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. मेळाव्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.

महायुतीच्या उमेदवार असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष उपस्थिती लावली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच खासदार पार्थ पवार हेही निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. वरिष्ठ नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

Rajya sabha oath : राज्यसभेत नव्या खासदारांची शपथ, व्हीलचेअरवरून शरद पवारांची उपस्थिती !

या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी भावनिक भाषण करत कार्यकर्त्यांना आवाहन केले. पवार कुटुंबाची परंपरा कायम राखण्यासाठी आणि बारामतीचा विकास पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र या शक्तिप्रदर्शनात एक बाब विशेष चर्चेत राहिली ती म्हणजे महिला नेतृत्वाची कमी उपस्थिती. उपमुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळात आदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर या नेत्यांसोबत सतत दिसत होत्या. तरीदेखील उमेदवारी अर्ज दाखल करताना चाकणकर यांची अनुपस्थिती जाणवली. तसेच इतर काही महिला नेत्या देखील या महत्त्वाच्या क्षणी अनुपस्थित असल्याचे दिसून आले.

Nana Patole : नानांचा पारा चढला, ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणाले, ‘मला बोलायला लावू नका’

प्रत्यक्ष अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत केवळ तीन महिला नेत्या उपस्थित होत्या. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार सरोज अहिर आणि आमदार सना मलिक या तिघीच महिला नेत्या दालनात दिसून आल्या. त्यामुळे पुरुष नेत्यांची मोठी उपस्थिती आणि तुलनेत महिला प्रतिनिधित्वाची मर्यादित उपस्थिती हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणुकीत केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन नव्हे, तर पक्षांतर्गत संतुलन आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्नही पुढे येण्याची चिन्हे दिसत आहेत.

__

error: Content is protected !!