Breaking

BARTI : अमरावतीत लवकरच होणार ‘बार्टी’चे उपकेंद्र

Free coaching facility for NEET and JEE will be available in Amravati : नीट व जेईईसाठी मोफत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार

Amravati महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या स्वायत्त संस्थेचे उपकेंद्र अमरावतीत लवकरच सुरू होणार आहे. आमदार सुलभा संजय खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामध्ये यश मिळाले असून, शासनाने अमरावती येथे विभागीय उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.

या केंद्रामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना नीट व जेईईसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बार्टीच्या पुणे येथील मुख्यालयातून सध्या या सुविधा पुरवल्या जात आहेत. मात्र, पुणेपर्यंत जावे लागल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अमरावतीत उपकेंद्र स्थापन झाल्यास स्थानिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Confusion in administration : एकाच दिवशी, एकाच पदासाठी दोन आदेश !

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या बार्टीमार्फत मोफत निवासी प्रशिक्षण, शिष्यवृत्ती योजना, जनजागृती उपक्रम, संशोधन प्रकल्प आणि क्षमताविकास कार्यक्रम राबवले जातात. या योजनांचा लाभ आता विदर्भातील विद्यार्थ्यांनाही सहज उपलब्ध होणार आहे.

Adivasi Pardhi Development Council : घोसपुरीत पारधी समाजाच्या गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण !

अमरावतीत उपकेंद्र सुरू करण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाजवळील मार्डी रोड परिसरात जागा निश्चित करण्यात आली असून, त्या जागेचे संरक्षक भिंत (वॉल कंपाउंड) बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र, केंद्र सुरू होण्यात प्रशासनिक प्रक्रियेमुळे विलंब होत होता. आमदार सुलभा खोडके यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पात या विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली. त्यानंतर आता अमरावती येथे बार्टीचे उपकेंद्र स्थापन करण्यास शासनाने अधिकृतरित्या पुढाकार घेतला आहे.