Breaking

District Court of Gondia : कुऱ्हाडीने मारहाण, बाप-लेकाला 5 वर्षे सश्रम कारावास !

Beating with an ax, father-son in 5 years imprisonment in Gondia : आठ वर्षांपूर्वीची घटना; जिल्हा न्यायालयाने दिला निर्णय

Gondia कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने बाप-लेकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. तसेच ५ हजार रुपयांदा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. दंड भरला नाही तर चार वर्षांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने बजावले आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी हा निर्णय दिला. सुरेश सदाशिव लांजेवार (वय ५७) व माणिक सुरेश लांजेवार (वय २५), दोन्ही रा. हेटी (गिरोला), ता. सडक अर्जुनी अशी दोषींची नावे आहेत.

२६ जून २०१७ रोजी ग्रामपंचायत हेटी व तंटामुक्त समिती हेटी यांच्या संयुक्त सभेत पीडित तुकाराम ईसरू लांजेवार (वय ७०) यांनी तक्रार केली होती. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत ही तक्रार होती. त्यानंतर २७ जून २०१७ रोजी सकाळी तुकाराम लांजेवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

Local Body Elections : उपसभापतीच होतील पंचायत समितीचे सभापती ?

सुरेश लांजेवार, माणिक लांजेवार व सुरेशची पत्नी ललिता लांजेवार यांनी कुऱ्हाडी, काठी व लाथाबुक्क्यांनी तुकाराम यांना मारहाण केली. या मारहाणीत तुकाराम गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुकाराम यांचा भाऊ नामदेव ईसरू लांजेवार (वय ६५) यांनी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे तक्रार दाखल केली.

सुरेश, माणिक आणि ललिता लांजेवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. जिल्हा सरकारी वकील महेश चंदवानी यांनी आरोपींविरुद्ध ११ साक्षीदार व महत्त्वपूर्ण कागदोपत्री पुरावे सादर केले. अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी सविस्तर युक्तिवाद करून आरोपींच्या दोषीपणाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला. सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने सुरेश व माणिक लांजेवार यांना दोषी ठरवले. पाच वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.

SP Nagpur Rural : पोलीस अधिक्षकांच्या सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून घेतली !

आरोपी ललिता लांजेवार हिला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंगेश काळे आदींनी काम केले.