Finally Macoca on Walmik Karad; SIT took custody in Beed Case : समर्थकांनी परळी शहरात दिली बंदची हाक
Beed शहरातील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act) लावण्यात आला आहे. त्यानंतर एसआयटीने SIT देखील त्याला ताब्यात घेतले आहे.
वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळी शहरात बंदची हाक दिली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीही बाजारपेठ गर्दीने सजली होती, मात्र कराडच्या समर्थकांनी रस्त्यांवर टायर पेटवून निषेध व्यक्त केला. मुख्य बाजारपेठ, मोंढा, टावर, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड या सर्व ठिकाणी बंद झाले होते.
National Youth Day : १०८ सामूहिक सूर्यनमस्कारांनी भारावली शेगावनगरी !
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांनी वाल्मिक कराडवर मकोका लावावा, अशी मागणी केली होती. या प्रकरणात आधी सात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता वाल्मिक कराडलाही या कायद्याच्या अंतर्गत आणण्यात आले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुळाशी पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे, ज्यामुळे ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी त्याची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. कराडच्या वकिलाने या मागणीला विरोध केला, ज्यामुळे जवळपास 35 मिनिटे युक्तिवाद झाला. न्यायालयाने अखेर वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ACB arrest : जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली एक हजार रुपयांची लाच !
वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात अजून कुणाचा समावेश असल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर वाल्मिक कराडच्या आईने आणि पत्नीने परळी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता. वाल्मिक कराडला जातीय राजकारणाचा बळी केला जातोय, असा आरोप त्यांनी केला.
नवीन एसआयटी
संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये वाल्मिक कराडशी संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.