Breaking

Belora Airport : अमरावती विमानतळावर प्रथमच एटीआर-७२ चाचणी

ATR-72 tested for the first time at Amravati Airport : विमानसेवा दृष्टिपथात; ३१ मार्चचा मुहूर्त टळल्यानंतर वेगाने काम

Amaravati अमरावतीने रविवारी ऐतिहासिक टप्पा गाठला. प्रथमच एटीआर-७२ चाचणी विमान यशस्वीरीत्या उतरले आणि प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या विमानतळ विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

प्रादेशिक संपर्क योजना RCS उडान अंतर्गत व्यावसायिक विमान सेवेसाठी या विमानतळाची तयारी झाल्याचे दर्शवणारे हे विशेष चाचणी विमान इंदूरहून अमरावतीला आले. हे केवळ एक चाचणी विमान नव्हते, तर हवाई प्रवासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारा एक निर्णायक क्षण होता. अलायन्स एअर alliance air च्या या चाचणी उड्डाणाने नव्या युगाचा संदेश दिला.

Mohan Bhagawat : सर्व शुभयोग आज जुळून आले, यासाठी तपस्या लागते !

रविवारी दुपारी ३:५६ वाजता विमान अमरावती विमानतळावर उतरले. एटीआर-७२ विमानाने सुरक्षित लँडिंग केली. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हँडलिंग क्षमतांची कसोटी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ४:१७ वाजता विमानाने पुन्हा इंदूरसाठी उड्डाण घेतले आणि या ऐतिहासिक घटनेची यशस्वी सांगता झाली.

अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन आता समीप आले आहे. हे विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) तर्फे उडान योजनेअंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ भौतिक सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरेल.

Narendra Modi : संघाची तपस्या लिहीत आहे विकसीत भारताचा नवा अध्याय !

हे यशस्वी चाचणी विमान केवळ प्रारंभ आहे. भव्य उद्घाटन सोहळ्यासह, अमरावती भारताच्या हवाई नेटवर्कमध्ये एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल. टियर-२ आणि टियर-३ शहरांना विमानसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. अमरावती विमानतळ महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळ हब होण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. अंतर कमी करणे, संधी निर्माण करणे आणि उज्ज्वल भविष्यासाठी झेप घेणे हेच यामागचे उद्दिष्ट आहे.