BJP leaders attack Thackeray brothers : ठाकरे बंधूंवर भाजप नेत्यांचा हल्लाबोल
Mumbai : बेस्ट एम्प्लॉईज को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनी मिळून लढवलेला उत्कर्ष पॅनेल एकाही जागेवर विजय मिळवू शकले नाही. सलग नऊ वर्षे बेस्ट पतपेढीवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे गटाला या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या राजकीय समीकरणांना धक्का देणारा मानला जात आहे.
या पराभवानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत टोला लगावला, “एकाकडे गमावण्यासाठी काही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्या गणिताचे उत्तर शून्यच निघाले. कालपर्यंत स्वतःची किंमत जोखण्याचं आव्हान देणाऱ्या दोन शून्यांना आज त्यांची किंमत कळली आहे.” असे त्यांनी म्हटले.
Modern system : मुंबई, नागपूर पुणेसारख्या शहरात आधुनिक वाहतूक व्यवस्था
तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही सोशल मिडियावरून ठाकरे बंधूंवर डिवचत लिहिलं, “जागा दाखवली… बेस्ट इलेक्शनमध्ये ‘ठाकरे ब्रँड’ २१ समोर ०. म्हणजेच ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत.”
निकालाचे समीकरण असे, एकूण जागा – २१ शशांकराव पॅनेल – १४ जागा, भाजप, नितेश राणे, किरण पावसकर सहकार समृद्धी पॅनेल – ७ जागा राज ठाकरे – उद्धव ठाकरे उत्कर्ष पॅनेल ० जागा. या निवडणुकीत ठाकरे गटाची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनेल उभा केला होता.
त्यांना आव्हान देण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदे गटाचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना एकत्र आले आणि सहकार समृद्धी पॅनेल तयार करण्यात आले.
Parliament session : ‘30 दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधानांसकट मंत्र्यांना पद सोडावे लागणार’
तर बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनेलने देखील सर्व २१ जागांवर उमेदवार दिले होते आणि त्यांनी तब्बल १४ जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली. या निवडणुकीचा निकाल ठाकरे बंधूंना मोठा धक्का देणारा ठरला असून भाजपकडून या पराभवाला ठाकरे ब्रँडच्या “राजकीय दिवाळखोरीचे प्रमाणपत्र” म्हटले आहे. आता या पराभवाचे पडसाद मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमटतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








