Breaking

Bhandara Municipality : नालेसफाईसाठी २० लाखांचा खर्च; तरीही अस्वच्छता कायम!

20 lakhs spent on cleaning drains; still, the cleanliness remains : नाले तुडुंब भरले, भंडाऱ्यात पावसाआधीच स्वच्छतेचा सवाल

Bhandara शहरातील नाल्यांची साफसफाई दरवर्षी मे महिन्यापासून सुरू केली जाते. यंदाही ही मोहीम मेच्या पहिल्या आठवड्यापासून राबवली जाणार आहे. यासाठी भंडारा नगर परिषद ने अंदाजे २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र दरवर्षी एवढा खर्च करूनही शहरातील नाले तुडूंब भरलेले दिसतात आणि पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात. त्यामुळे खर्चाच्या पारदर्शकतेवर आणि स्वच्छतेच्या प्रत्यक्ष परिणामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे दीड लाखांवर पोहोचली असून, झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे नगरपालिकेवर साफसफाईचा बोजा वाढत आहे. सध्या भूमिगत गटार योजनेचं कामही सुरू आहे. यासाठी रस्ते खोदले गेले असून, हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. विशेषतः जेथे पाइप टाकण्याचं काम सुरू आहे, तेथील रस्ते आधीच खड्डेमय झाले आहेत.

RTO Checking : कारवाईनंतर शिरपूरबांध नाक्यावर ‘नो चेकिंग डे’!

शहरातील काही भागांमध्ये नागरिकांनी थेट नाल्यावरच अतिक्रमण केलं आहे. अशा ठिकाणी सफाई करणे मोठं आव्हान ठरत आहे. शिवाय जुन्या भागांतील नाले व रस्ते अरुंद असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. काही नागरिक प्लास्टिक व कचरा थेट नाल्यात फेकतात, यामुळे नाले तुंबतात आणि डासांचा प्रादुर्भाव वाढतो.

भंडारा नगरपालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज सुरू आहे. निवडणुका होऊ न शकल्याने नगरसेवकच नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत. अनेक प्रभागांमध्ये दररोज कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. नालेही वेळेवर स्वच्छ होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतोय.

“दरवर्षी मे महिन्यात नालेसफाईचे काम होते. लवकरच स्वच्छतेचे काम सुरू होणार आहे. नागरिकांनी नाले व गटारांत कचरा टाकू नये. साफसफाईसाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा,” असं आवाहन नगर परिषद आरोग्य निरीक्षक मुकेश शेंदरे यांनी केलं आहे.

Water crisis : तलावांच्या जिल्ह्यातील धरणं रिकामी!

दरवर्षी पोकलँड, जेसीबी आणि मजूरांच्या सहाय्याने ही मोहीम राबवली जाते. मात्र, नागरिकांचा सहकार्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कचरा योग्य ठिकाणी टाकावा, अतिक्रमण रोखावं आणि नगरपालिकेला सहकार्य करावं, हीच वेळची गरज आहे. अन्यथा यंदाही पावसाळा अस्वच्छतेचा मारा घेऊनच येईल!