Mahayuti claims large numbers : जिल्हा परिषद सभापतिपदाची निवडणूक; महायुतीचा मोठा दावा
Bhandara जिल्हा परिषद सभापतिपदासाठी आज, शुक्रवार दि. ७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. काँग्रेससह महायुतीमधील सारेच सदस्य गटासोबत सहलीला गेले आहेत. त्यांच्या सहलीचाही आज शेवटचा दिवस असणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला रंग चढणार असल्याने संख्याबळाच्या लढाईत ‘किसमें कितना है दम’ हे आता स्पष्ट होणार आहे.
महायुतीकडून सक्षम संख्याळाचा दावा केला जात आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे दिसले तेच चित्र सर्व सभापतीपदांच्या निवडणुकीत राहील. असा विश्वास भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. तर, काँग्रेसकडूनही चमत्काराची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसला ५ सदस्यांच्या संख्याबळाची गरज आहे. ती पूर्तता कशी करणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहे. काँग्रेसकडून फोडाफोडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजीत पवार गटाने आपले सर्व सदस्य सहलीवर पाठविले आहेत.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे आणखी एक फलीत
भाजपचे सदस्य मंगळवारी भंडाऱ्यातून खाना झाले तर, राष्ट्रवादीचे सदस्य आमदार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाला झाले आहे. या सर्व सदस्यांच्या हालचालीवर पक्षनेते बारीक लक्ष ठेऊन आहेत.
काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी सहा सदस्यांची गरज आहे. ती पुर्ण करण्यासाठी भाजपमधील एका तसेच राष्ट्रवादीसोबत गेलेल्या चार सदस्यांच्या नेटवर्कमध्ये काँग्रेसचे नेते असल्याची चर्चा आहे. मात्र हे सदस्य काँग्रेसच्या निमंत्रणाला कितपत दाद देतील हे निवडणुकीच्या दिवशी दिसणार आहे.
भाजपच्या ११ सदस्यांसोबत एक अपक्ष आणि एक शिवसेना असेन १३ सदस्य आहेत. ते सर्वजण सोबत असून पक्षनेते त्यांच्या सतत संपर्कात आहेत. काँग्रेसची नजर अपक्षांवर असल्याने नेतेमंडळी विशेष दक्षता घेत आहेत.
Chandrakant Patil : पुणेकरांच्या सोयीची कामे प्राधान्याने पूर्ण करणार !
युती-आघाडीपुढे मोठे आव्हान
महायुतीला लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर विधानसभेत कमबॅक केले. तर महाविकास आघाडीकडे पूर्ण रिकामपण आलं. अशा परिस्थितीत महायुतीपुढे वैभव कायम ठेवण्याचे, तर महाविकास आघाडीपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असेल.