Breaking

Bharat Gogawale : तसं असतं तर आत्तापर्यंत पालकमंत्री पद मिळवलं असतं

Gogawales reply on accusation of Aghori worship :!अघोरी पूजेच्या आरोपावर गोगावलेंचे विरोधकांना उत्तर!

Karjat : अघोरी विद्या येत नाही आणि मनात नाही तसे असते तर आत्ता पर्यंत तसं असतं तर आतापर्यंत पालकमंत्री पद मिळवलं असतं अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्यावर झालेल्या गौरी पूजेच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आणि मोठी चर्चा सुरू झाली होती, यावर त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. त्यावरून राज्यात चांगल्याच चर्चा रंगल्या. गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजाा केली असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी केली होती. तर त्यानंतर महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडूनही भरत गोगावलेंचा आणखी एक दुसरा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. सूरज चव्हाण यांनी गोगावलेंवर अघोरी विद्येचा आरोप केला.

NCP Sharad Pawar: सक्ती नको पण, 60 टक्के लोक हिंदी बोलतात त्यामुळे दुर्लक्ष नको

या सर्व प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली यातच आता गोगावले यांनी य़ा विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अघोरी विद्या आम्हाला कळत नाही, अघोरी विद्या माहीत असती तर आत्तापर्यंत कधीच पालकमंत्री झालो असतो, असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. कर्जत येथे गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची कार्यकारणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीप्रसंगी अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेलीच गोगावले यांनी सध्या अघोरी विद्येच्या, पूजेच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आणि विरोधकांना टोलाही लगावला.

Bacchu Kadu : बच्चू कडूंना दिलासा नाहीच; अध्यक्षपदाच्या अपात्रतेवरील निर्णय २४ जूनला

आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही लढणारे आहोत, रडणारे नव्हे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. एकनाथ शिंदेंसारख्या प्रामाणिक नेत्यासोबत आम्ही काम करतो त्यामुळे ही अघोरी विद्या, अघोरी पूजा वगैरे आम्हाला काहीही कळत नाही, आम्हाला ते माहीत नाही. जे नशिबात आहे तेच होतं. अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्री पद मिळवलं असतं, असं म्हणतं त्यांनी प्रत्युत्तर दिलं. अघोरी, बिगारी आम्ही जाणत नाही, साधू महात्मे भेटायला येतात त्यानं आम्ही भेटतो. राष्ट्रवादी कडे मुद्दे नाहीत म्हणून ते शोधाशोध करीत आहेत अशी टीकाही गोगावले यांनी केली.

Chandrashekar Bawankule: ‘ते’ भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलता

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप केला होता. त्यांनी समाज माध्यमावरून दोन व्हिडिओदेखील शेअर केले होते. त्यात मंत्री गोगावले हे काही पूजा करताना दिसत होते. मात्र ही पूजा कशाची,ती का करण्यात आली, यातची काही माहिती त्यातून समोर आली नाही. पण गोगावले यांची ही पूजा अघोरी असल्याचे सांगत अघोरी विद्येसाठी ही पूजा बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आल होता.

____