Bharatiya Mazdoor Union opposes smart electric meter : स्मार्ट मीटरला जाहीर विरोध; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
Nagpur विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा होता. मात्र आता स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने भाजपचेच मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारच्या योजनेला विरोध केला आहे. स्मार्ट विद्युत मीटर लावण्यास सुरुवात होणार आहे. असे असताना भामसंने त्याला विरोध केला आहे. सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध कयास लावण्यात येत आहे.
उर्जा खात्यातर्फे दर तीन ते चार वर्षांनी नागरिकांना आर्थिक भुर्दंड पोहोचविणारी एखादी योजना आणण्यात येते. आता स्मार्ट मीटर लावण्याची तयारी सुरू झाली आहे. या स्मार्ट मीटरला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. विविध संघटनांनी याबाबत आवाज उठविला होता. आता संघप्रणित भामसंनेदेखील विरोधाचा सूर आवळला आहे.
Eknath Shinde : आनंद दिघेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक !
अदानी समुहाला विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. महाविकास आघाडी आणि विरोधकांच्यावतीने आधीपासूनच यास विरोध केला जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विद्युत मीटर लावण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र महायुतीचे सरकार स्थापन होताच पुन्हा विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात झाली आहे. भामसंच्या एम.एस.ई.डी.सी.एल. MSEDCL कंत्राटी विद्युत मिटर रीडर संघाच्यावतीने या विरोधात विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता.
Fault in E-tendering : बाजार समितीमध्ये ४४ लाखांचा गैरव्यवहार!
मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री तसेच मुख्य अभियंतांना निवेदन देऊन यावर चर्चा करण्याठी बैठक बोलावण्याची मागणी केली होती. मात्र याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप भामसंकडून करण्यात आला आहे. सरकारकडून आमच्या मागण्यांना गंभीरतेने घेण्यात येत नसल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. जर ३१ जानेवारीअगोदर सरकारने चर्चेची तयारी दाखविली नाही. तर फेब्रुवारी महिन्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा भामसंतर्फे देण्यात आला आहे. हे आंदोलन बेमुदत असेल व याचा फटका ग्राहकांनादेखील बसू शकतो.