Bhaskar Jadhav on Narayan Rane : नारायण राणेंच्या उद्धव ठाकरेंवरील टिकेला जाधवांचे प्रत्युत्तर
Mumbai : भाजप खासदार नारायण राणे तसेच त्यांचे दोन्ही मुले उद्धव ठाकरे यांच्यावर कायम टीका करत असतात. राणींनी अशीच टीका पुन्हा केली त्यावरnभास्कर जाधव यांनी राणींना प्रत्युत्तर दिले यावेळी त्यांनी राणी फॅमिलीवर जोरदार टीका करताना ‘ नेपाळी वाचमन’ असा उल्लेख मंत्री नितेश राणे यांच्या बाबत केला.राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते. राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला? असा प्रश्न आहे त्यांनी उपस्थित केला आहे.
त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढत आहेत. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. दरम्यान भाजप खा. नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘ जो बूंद से गई वो हौद से नहीं आती…,’ असं म्हणत उद्धव ठाकरे भाऊबंदकी या नात्याने राज ठाकरे यांना परत जवळ करायचे प्रयत्न करत आहेत. उद्धवनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रास दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले. त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : तुरूंगात टाका, चालेल.. पण शेतकऱ्यांसाठी लढ राहू !
भास्कर जाधव म्हणाले की, नारायण राणेंना आत्ताच राज ठाकरे यांच्यावर प्रेम आले असेल तर आठ दिवसापूर्वी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राणेंना त्यांची जागा दाखवून दिली. नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल किंवा त्यांच्या मुलाने त्यांच्या बद्दल जे वक्तव्य केले, त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलं आहे की, राणे हा ‘एहसान फरामोश’ माणूस आहे. त्यामुळे मला वाटते की, त्यांनी दिलेले उत्तर पुरेसे आहे. भास्कर जाधव पुढे म्हणाले की, नारायण राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला? तुम्ही तुमचा पक्ष काढला आणि एक वर्षात आपला पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या.
तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? तुम्ही भाजपाच्या चिपळूणच्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांना इशारा का दिला? त्याचे उत्तर द्या. खरे तर नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते. परवाच्या दिवशी मंत्री असलेला ‘ नेपाळी वॉचमन’ सारखा दिसणारा पोरगा त्याने कोणत्या भाषेत माझ्यावर टीका केली? हेच मंत्री भारतीय जनता पक्षाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली असते, अशा लोकांबद्दल पुन्हा मला विचारू नका असेही जाधव म्हणाले.
सन्माननीय राजजी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिल. त्यांना उद्धव ठाकरेंनी बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविल, याने सत्ता घालविली. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही. अशी टीका नारायण राणे यांनी समाज माध्यमावर केली त्यावर जाधव बोलत होते.