Bhaskar Jadhav : ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री; राजकीय कारकीर्द संपली तरी हरकत नाही !

Bhaskar Jadhavs attack on Brahmin Sahayak Sangh : भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल

Mumbai: गुहागर तालुक्यात ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यात सुरू असलेला वाद शिगेला पोहोचला. मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यात जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाच्या नेत्यांवर जोरदार टीका करत, “ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात” अशी वक्तव्ये केली. तसेच, “आज मी जे बोलतोय त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही. माझी राजकीय कारकीर्द संपली तरी हरकत नाही,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी वक्तव्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

जाधव यांनी गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना ‘बेडकाची’ उपमा देत, माझ्याविरोधात जिल्ह्यात किंवा राज्यात पत्र द्या, मी ते गटारात फेकून देईन, असेही म्हटले. त्यांनी आरोप केला की, निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला भडकवले गेले. तसेच, वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर खोटा आरोप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Flag hoisting : ध्वजारोहणाचा मान राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना

“लढाई कितीही मोठी होऊ द्या, पण माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना मी सोडणार नाही. बदनाम करून खच्ची करण्याचे काम सुरू आहे. समोरासमोर दोन हात करण्याची हिंमत नसल्याने हे प्रकार घडत आहेत,” असे ते म्हणाले. त्यांनी गुहागरमधील कुणबी समाजालाही इशारा देत, “मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकलं म्हणून समजा. तुमच्या घरात उद्या पूजा सांगायला कोणी नसेल तर मी स्वतः येईन,” अशी टीका केली.

भास्कर जाधव यांनी 2024 च्या निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर जातीवाचक वक्तव्यांचा आरोप करून अटकेसाठी दबाव टाकण्यात आल्याचाही उल्लेख केला. “तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वरून नेत्यांचे फोन येत होते की मला अटक करा. पण पोलिसांनी पुरावा नसल्याने अटक केली नाही,” असे ते म्हणाले.

Uddhav Balasaheb Thackeray : जीवंत देखाव्यांमधून महायुती सरकारवर टीका

जाधव यांनी भाजप व ब्राह्मण सहाय्यक संघावर मराठा आणि कुणबी समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केला. “मी आतापर्यंत शांत होतो, पण आता कोणाला सोडणार नाही. मी वाघाची अवलाद आहे, सहजासहजी गुडघे टेकणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

त्यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाच्या निषेध पत्रिकेवर प्रश्न उपस्थित करत, “मी दोन-चार कार्यकर्त्यांबद्दल बोललो आणि ते विशिष्ट समाजाचे असतील तर त्या समाजावर तो विषय गेला? निवडणुकीच्या वेळी जात जागवली जाते. महाराष्ट्रात विकासकामांसाठी पैशाची कमतरता भासणार नाही, पण भास्कर जाधव एक रुपया कमी पडू देणार नाही,” असेही ते म्हणाले.

____