Shiv Sena hints at fielding candidates for all seats in Nagpur : भास्कर जाधवांनी स्पष्टच सांगितलं; नागपुरात सर्व जागा लढण्याचेही संकेत
Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी असाच खेळ होता. मात्र आता दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा चांगलाच गोंधळ होणार आहे. अशात ना युती, ना आघाडी, आपली ताकद बघून लढा, असे संकेतही देण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी नागपुरात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सर्व १५५ जागा लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असताना शिवसेनेच्या दोनच जागा निवडून आल्या होत्या. आता दोन शिवसेना मिळून किती ताकद लागणार आणि किती जागा जिंकणार हा प्रश्न आहेच. तरीही निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांची उणीव नाही. भास्कर जाधवांनी कुणाची लढण्याची इच्छा आहे म्हणताच बायोडेटा तयारच होता. पण इच्छुकांना आपल्या आर्थिक क्षमतेवरच लढावे लागणार असल्याचेही स्पष्ट केले.
Local Body Elections : गडचिरोली ते बुलढाणा… भाजपकडून निवडणुकीची जोमाने तयारी!
पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी एकही रुपया मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्टच सांगून टाकले. निवडणूक स्वतःच्या खर्चाने लढायची. पक्षाकडून पैसे मिळणार नाहीत. नागपुरात सभा घ्यायला मोठा नेता येणार नाही. बैठका होणार नाहीत. मग एवढा खटाटोप करायचा कशाला, असा सवालही भास्कर जाधव यांना विचारण्यात आला. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासंदर्भात जाधवांकडे नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी नसल्याचे स्थानिक नेत्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. अशात शिवसेनेला ‘एकला चलो रे’ची भूमिका घ्यावीच लागणार होती. त्यादृष्टीने भास्कर जाधव यांनी संकेतही दिले.
इच्छुकांनी आपला बायोडाटा पक्षाकडे तात्काळ सादर करावा व निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला महिला आघाडी, युवासेना तसेच अंगीकृत असलेल्या संपूर्ण उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले होते. भास्कर जाधव सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यांच्या सूचनांची नोंद करुन महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची काय तयारी आहे याचा आढावा घेतला.
Sanjay Raut on Plane Crash : सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का?
१५१ जागा असो की १५६ सर्व जागांवर लढण्याची तयारी ठेवा. यासाठी आढावा बैठकी घ्या, नियोजन करा, आम्ही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू अशी ग्वाही भास्कर जाधव यांनी दिली. यावेळी उपनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया, सतीश हरडे, सुरेश साखरे, सागर डबरासे, डॉ. अनुजा बोधनकर, सुरेखा खोब्रागडे यांच्यासह संघटनेतील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.