Breaking

Bhendwal Ghatmandani : शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा, पावसाचा धोका

Cautionary warning for farmers, risk of unseasonal rains : भेंडवळ घटमांडणी जाहीर; यंदा अवकाळीचे संकट, पावसाळा संमिश्र

Buldhana महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. आधुनिक काळातही अनेक बाबी आजही भेंडवळच्या घटमांडणीने नोंदविलेल्या भाकितानुसार ठरत असतात. विशेष म्हणजे या घटमांडणीत काय पुढे येतं, यानुसार शेतकरी सुद्धा आपलं नियोजन करत असतात. गुरुवारी (दि. १ मे) भेंडवळची घटमांडणी जाहीर झाली. यात शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

घटमांडणीच्या आधारे यंदाच्या पावसाळ्याचेही भाकीत जाहीर करण्यात आले. यंदाचा पावसाळा संमिश्र राहणार आहे. काही भागांत अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी, पिकांच्या उत्पादनात अनिश्चितता राहणार आहे. शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Teachers appopintment scam : शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण अमरावतीत

भेंडवळ येथे पहाटे सहा वाजता पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी घटातील निरीक्षणानंतर हे भाकीत जाहीर केले. यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. भाकितानुसार जूनमध्ये सरासरी पाऊस, जुलै व सप्टेंबरमध्ये भरपूर, तर ऑगस्टमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. काही भागांत अवकाळी पावसामुळे पीकनुकसानीचा तसेच रोगराईचा धोका निर्माण होईल.

घटमांडणीमध्ये ठेवलेल्या १८ धान्यांतील फेरबदलावरून मसूर दबलेले आढळल्याने देशासमोर संकट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, करडी धान्य शाबूत असल्याने संरक्षण व्यवस्था भक्कम राहील, असे संकेत देण्यात आले.

पिकांमध्ये उत्पादनातील तफावत राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पीक भरघोस, तर काही भागात कमी उत्पादन होईल. त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Akash Fundkar : महाराष्ट्राचा होतोय सर्वसमावेशक विकास!

राजाचा ताण वाढणार?
भेंडवळच्या घटमांडणीने नोंदविलेल्या भाकितानुसार देशाचा राजा कायम असणार आहे, पण त्याचा ताण वाढणार आहे. शिवाय शेजारी राष्ट्रांकडून त्रास वाढणार आहे, पण युद्ध होणार नाही, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.