Bhimashankar Jyotirlinga : या सुविधांमुळे ६० गावांतील भक्तांची सोय!

3.81 crore works from Chief Minister Road Scheme : तीर्थस्थळाचा विकास; मुख्यमंत्री सडक योजनेतून ३.८१ कोटींची कामे

Akola ग्रामीण भागातील तीर्थस्थळांचा विकास आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील सहा तीर्थस्थळांच्या विकासासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेतला. या अंतर्गत अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पानेट तीर्थस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. जवळपास ६० गावांतील भक्तांना यात्रा आणि महाशिवरात्रीच्या काळात अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहेत.

या तीर्थस्थळाला भाविकांसाठी अधिक सुसज्ज करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून १ कोटी ७१ लाख रुपये मंजूर करून १० किमी रस्ता विकसित करण्यात आला आहे. तसेच, विविध विकासकामांसाठी २ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सुविधांमुळे सुमारे ६० गावांतील भक्तांना यात्रा आणि महाशिवरात्रीच्या काळात अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहेत.

Project Victims of Amravati : पालकमंत्र्यांनी पुनर्वसित गावांना घ्यावे दत्तक!

महाशिवरात्रीच्या पर्वावर तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त या विकासकामांचे लोकार्पण २६ फेब्रुवारी, बुधवार रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, जयंत विजय अग्रवाल, राजेश रावणकर, राजेश नागमते, दिनकर पाटील, संतोष शिवरकर, सुभाष मुकुंदे, डॉ. चाकोते, मनीष मोडक, दत्तू पाटील गावंडे, विनोद मंगले, दादापेठे पवन वर्मा, भूषण बजारे, माधव बकाल, मंगेश घुले, बाळू पाटील, गजानन नळे, दिलीप सुलताने, ज्ञानेश्वर मोडक, डॉ. किरण ठाकरे, महेश ने साहेब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Centenary year of RSS : संघाच्या शताब्दी वर्षाचे प्लानिंग कर्नाटकमध्ये!

आमदार रणधीर सावरकर यांनी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, पर्यटनस्थळ म्हणून या तीर्थस्थळाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल तसेच या ठिकाणी श्रद्धा, भक्ती आणि परंपरा यांचे जतन होईल.

महाशिवरात्रीच्या पर्वावर आयोजित या लोकार्पण सोहळ्याला भाविक भक्त आणि विकासप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला पूर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.