Congress wins in the constituency where Akola party workers campaigned : फारबिसगंजमध्ये मनोज विश्वास यांचा अल्पमतानं विजय
Akola संपूर्ण बिहारमध्ये काँग्रेसची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असली तरीही अकोल्यातील नेत्यांनी मेहनत घेतलेल्या मतदारसंघात यश आलं आहे. अकोल्यातील आमदार व कार्यकर्त्यांनी ज्या मतदारसंघात प्रचार केला त्याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.
बिहार विधानसभेच्या ४८-फारबिसगंज मतदारसंघात काँग्रेसने विजयाची नोंद केली आहे. काँग्रेसचे उमेदवार मनोज विश्वास यांनी भाजपचे विद्यमान आमदार व उमेदवार विद्यासागर केशरी यांचा २२१ मतांनी पराभव करत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या झोळीमध्ये टाकला. या विजयात अकोला येथील आमदार साजिद खान पठाण व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे मोठे योगदान असल्याचे काँग्रेस वर्तुळात मानले जात आहे. स्थानिक पातळीवरील संघटन बळकट करून जनतेपर्यंत सातत्याने पोहोचण्याचा त्यांनी घेतलेला धडाका काँग्रेसच्या विजयाला कारणीभूत ठरल्याचे पक्षातील नेत्यांचे मत आहे.
Local Body Elections : नगरसेवक पदासाठी १६२ तर नगराध्यक्षपदासाठी १६ अर्ज दाखल
फारबिसगंजमध्ये यंदाची लढत अत्यंत चुरशीची ठरली. मतमोजणीदरम्यान आघाडीचे चित्र वारंवार बदलत राहिले. अखेर शेवटच्या फेरीत काँग्रेस उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. भाजपचे विद्यासागर केशरी हे विद्यमान आमदार असल्याने त्यांना सत्ता-विरोधी लाटेचा फटका बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Bihar CM : भाजप जेडीयू च्या यशानंतर एकच प्रश्न बिहारचा मुख्यमंत्री कोण?
या निकालामुळे बिहारमध्ये काँग्रेसला कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा मिळाली असून आगामी निवडणूक प्रक्रियांसाठी हा विजय प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिली. आमदार साजिद खान पठाण यांच्यासोबत बिहार निवडणुकीत प्रचार करण्यासाठी काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव व इतर सहकारी तळ ठोकून होते.








