Breaking

Bihar Politics : अकोल्याचे सुपुत्र शिवदीप लांडे गाजवणार बिहारचे राजकारण!

Retired IPS Shivdeep Lande will rule Bihar politics : सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची ‘हिंद सेना’तून राजकीय इनिंग

Akola अकोला जिल्ह्यातील पारस गावचा सुपुत्र आणि चर्चेत राहिलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे आता बिहारच्या राजकारणात आपली नवी इनिंग सुरू करणार आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी बिहारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता आणि आता त्यांनी ‘हिंद सेना’ नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला आहे. येत्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत ते आपला पक्ष रिंगणात उतरवणार असून ‘सामाजिक न्याय’ या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

शिवदीप लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील पारस येथील असून त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांची आई जिल्हा परिषद सदस्य राहिल्या असून त्यांचे भाऊ ग्रामपंचायत सदस्य होते. शिवदीप लांडे यांचे सासरे विजय शिवतारे हे महायुतीचे उमेदवार होते.

Water shortage : मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री, डझनावर आमदार; तरी नळाला नाही धार!

आयपीएस सेवेत असताना त्यांनी बिहारसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली होती. बिहारमध्ये त्यांनी गुन्हेगारी विरोधातील कठोर कारवाईमुळे विशेष लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या कार्यपद्धतीला तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याच लोकप्रियतेचा आधार घेत आता ते राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

लांडे यांनी स्थापन केलेल्या हिंद सेनेचा मुख्य उद्देश सामाजिक न्याय, भ्रष्टाचारविरहित प्रशासन, आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष बिहारमधील विविध मतदारसंघांत उमेदवार उभे करणार आहे. लांडे स्वतः कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे अद्याप जाहीर झालेले नसले तरी त्यांच्या पक्षाच्या रणनीतीची आखणी जोरात सुरू आहे.

Amravati BJP : अंजनगावात भाजप अध्यक्ष निवडणूक गदारोळात

बिहारमधील सामाजिक परिस्थिती आणि तरुणांच्या अपेक्षा लक्षात घेता, लांडे यांच्या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनातील अनुभव, निर्भीड नेतृत्व आणि जनसामान्यांशी असलेला थेट संपर्क ही त्यांची ताकद ठरू शकते.