Bihari election result : महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारनं नाकारलं !

Former IPS Shivdeep Lande defeated in both constituencies : माजी आयपीएस शिवदीप लांडे दोन्ही मतदारसंघात पराभूत

Patna : बिहारमध्ये ‘सिंघम’ म्हणून नावाजले गेलेले आणि दबंग पोलिस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आयपीएस शिवदीप लांडे यांना बिहारच्या मतदारांनी नेता म्हणून नाकारले आहे. अररिया आणि जमालपूर या दोन्ही मतदारसंघांत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार प्रचार केला होता, परंतु दोन्हीकडे त्यांचा दारुण पराभव झाला.

जमालपूरमध्ये जनता दल यू चे उमेदवार नचिकेत यांनी 96,683 मतांनी विजय मिळवला, तर इंडियन इन्क्लूजिव्ह पार्टीचे नरेंद्र कुमार 60,455 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवदीप लांडे तिसऱ्या स्थानी राहिले आणि त्यांना फक्त 15,655 मते मिळाली.

Mumbai BMC Election : मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू !

अररिया मतदारसंघात तर लांडे यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे अबीदूर रहमान 91,529 मतांसह विजयी झाले, तर लांडे यांना केवळ 4,085 मते मिळाली. एमआयएमचे मोहम्मद मन्झूर आलम यांनी 53,421 मते मिळवत तिसरे स्थान पटकावले.

२०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी ‘हिंद सेना’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. पक्षाची नोंदणी न झाल्याने त्यांनी दोन्ही मतदारसंघांतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पोलिस दलात प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या लांडे यांच्या बेधडक कारवाया प्रसिद्ध होत्या, पण ती लोकप्रियता मतांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही.

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 20.4 कोटींची संपत्ती आणि 2.7 कोटींचे कर्ज असल्याचे स्पष्ट होते. गुन्हेगारी आरोप एकही नसतानाही त्यांच्या ‘स्वच्छ प्रतिमे’ला मतदारांनी पसंती दिली नाही.

Ambadas Danve : अंबादास दानवे सुरक्षित घराच्या शोधात?

यावेळी बिहारमध्ये भाजपा-जदयूच्या एनडीए आघाडीने एकूण 243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय मिळवत प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली. तर राजद-काँग्रेस महाआघाडीला फक्त 35 जागांवर समाधान मानावे लागले.