It will be difficult to beat the stick; Teachers’ difficulties increased : दांडी मारणे होणार अवघड; शिक्षकांची अडचण वाढली
Wardha : बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे आता उपस्थिती घेतली जाणार आहे. राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शाळेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
Promotion of industries : जिल्ह्यात उद्योगांना चालना, गतवर्षात उद्योग वाढले !
सर्व शाळांना बायोमेट्रिक मशीन देण्यात येणार आहेत. आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची हजेरीही बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व अनुदानपात्र शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणाली किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्याचे आदेश आहेत.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिकवर घेतली जाणार आहे. ही हजेरी बंधनकारक आहे. शाळेला दांडी मारणाऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दैनंदिन हजेरी ही बायोमेट्रिक पद्धतीने व्हावी, यासाठी शासनाने आदेश काढले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे निर्देश माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
Female wrestlers : राज्यभरातील २०० महिला पहेलवानांमध्ये झुंज सुरू !
राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू असणार आहे. काही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळेत न येता आपले घरगुती काम करीत असतात. अशा शिक्षकांची आता अडचण वाढली आहे.
शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी शिक्षण विभागाकडे संबंधितांना द्यावी लागणार आहे. अपडेट हजेरी दिल्यानंतरच अनुदान मंजुरी, पगार आदींबाबत विचार होणार आहे. राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये बायोमेट्रिक प्रणाली नोंदविण्याचे काम दिले आहे. शिक्षण विभागाकडून हे काम सुरू करण्यात आले आहे.