Breaking

BJP Congress Nagpur Zilla Parishad : भाजप-काँग्रेसचे ‘हम साथ साथ है’!

Both parties bjp and congress agreed on the extension : एका मुद्यावर एकमत; मुदतवाढ देण्याच्या मागणीला पाठिंबा

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. भाजपकडून पुढील निवडणुकीची आतुरतेने प्रतिक्षा करण्यात येत आहे. मात्र निवडणूक होईपर्यंत जिल्हा परिषदेला मुदतवाढ देण्याच्या काँग्रेसच्या ठरावासोबत भाजप उभी राहिली. भाजपने साथ देऊन राजकीय खेळीच खेळली आहे. जिल्हा परिषदेची पुढील निवडणूक होईपर्यंत शासनाने मुदतवाढ देण्याचा ठराव करण्यात आला.

गुरुवारी (2 जानेवारी) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमताने पारित करण्यात आला. या मुदतवाढीसाठी भाजपच्या सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली नाही, असे आजवर घडले नाही. मात्र विद्यमान सदस्य व पदाधिकाऱ्यांची ही अखेरची सभा असल्याने सभेच्या अजेंड्यावरील विषयांना विरोधकांनी विरोध दर्शवला नाही.

बहुतांश ठराव एकमताने संमत करण्यात आले. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हा होणार, हे कोणालाच सध्या सांगता येत नाही. त्यात नागपूर जिल्हा परिषदेसह पाच जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ 17 जानेवारीला संपत आहे. अशा परिस्थितीत प्रशासक न बसवता विद्यमान अध्यक्षांना पुढील निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी मांडला.

Congress BJP काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सत्कार !

या प्रस्तावाला सर्वपक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. आम्ही ठरावाच्या बाजूने असल्याचे विरोधी पक्षनेते आतिष उमरे यांनी स्पष्ट केले. भाजपचे व्यंकट कारेमोरे यांनीही ठराव पारित करून शासनाकडे पाठविण्याची सूचना केली. ठराव एकमताने मंजूर करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी दिले.

तात्पूरती सहमती..
भाजप आणि काँग्रेस एखाद्या मुद्यावर एकत्र येणे ही अपवादात्मक परिस्थिती असते. त्यामुळे यात केवळ राजकीय स्वार्थ्य असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुन्हा दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील, याची पूर्ण जाणीव सर्वांना आहे.