BJP District President : नांदेड ग्रामीणला उसना जिल्हाध्यक्ष का दिला जातो?

Why is the BJP district president giving of other place to Nanded rural : दक्षिण ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदासाठी नेतेच नाहीत का?

Nanded : नांदेड दक्षिण जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीच्या चर्चेचा विषय ऐरणीवर येतो आहे. बूथ अध्यक्षांचे सर्व कामकाज पूर्ण होऊन सक्रिय सदस्य नोंदणी पूर्ण करत आता मंडळाध्यक्ष निवडीसाठीचे कामकाज पूर्णतः आटोपले असल्याची माहिती आहे. यात पुढील विषयाचा विचार करता नांदेड दक्षिण ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दर वेळी येथे इतर ठिकाणचा जिल्हाध्यक्ष दिला जातो. पण यावेळी जिल्हाध्यक्ष हा उसना नको, अशी काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण भाजपाने २०२३ साली जिल्हाध्यक्ष निवडीच्या वेळी निकषांचा विचार न करता तत्कालीन परिस्थितीचा विचार करून जुन्या भाजपातील नेता जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडला जावा, असा विचार केला होता.

Dharmapal Meshram : पारधी समाज बांधवांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू !

२०२५ सालच्या संघटनात्मक निवडणुकीवेळी मात्र महानगरातील “उसना जिल्हाध्यक्ष” ग्रामीणला नको अशीच काहीशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याची माहिती समोर येते आहे. या दक्षिण ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदासाठी नेतेच नाहीत का? या दक्षिण जिल्ह्यात लोहा-कंधार, मुखेड, देगलूर-बिलोली, नायगाव-उमरी-धर्माबाद असे ४ विधानसभा मतदारसंघ व ८ तालुके गणले जातात. परंतु अद्याप एकही व्यक्ती जिल्हाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडे नाही, ही आश्चर्यजनक बाब आहे.

विविध मतदारसंघातून भाजपचे जाणते नेते इच्छुक आहेत. यात श्रावण भिलवंडे, एकनाथ पवार, लक्ष्मण ठक्करवाड, बालाजी बच्चेवार, माधव उच्चेकर आदी. अशी सक्षम मंडळी भारतीय जनता पार्टीकडे असताना विभाग स्तरावर संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना कसे काय निदर्शनास येत नसावे, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

Dapoli Politics : विरोध संपला, विश्वास वाढला: संजय कदम यांची योगेश कदमांना साथ !

सातत्याने महानगरातील पुढाऱ्यांची नावे ग्रामीण पदाधिकारी व संघटनात्मक निवडणूकीदरम्यान सुचविण्यात का स्वारस्य आहे? विभागस्तरावर संघटनात्मक जवाबदारी असणारे प्रमुख व्यक्ती महानगरातील व्यक्तींचा विचार करतात, ही बाब ग्रामीण पदाधिकाऱ्यांना बोचते आहे. कुणी उघडपणे बोलत नाही. पण अंतर्गत चर्चा अशी आहे की, नांदेड दक्षिण ग्रामीणला उसना जिल्हाध्यक्ष नकोच, ही कार्यकर्त्यांची भावना असल्याची असल्याचे सांगितले जात आहे.