BJP will dominate in local elections : नागपूर जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा विश्वास
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागपूर जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा विश्वास भाजपच्या दोन्ही नव्या जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे व आनंदराव राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपच स्थानिक निवडणुका जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
ग्रामीण भागात भाजपचे काम तळागाळापर्यंत आहे. विधानसभेत भाजपने जिल्ह्यात चांगले यश मिळविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्याच निकालांची पुनरावृत्ती होईल. आम्ही जिल्ह्यात काँग्रेसला बॅकफूटवर नेऊ, असा विश्वास कुंभारे व राऊत यांनी व्यक्त केला.
भाजपने आगामी निवडणुकांचे नियोजन म्हणून जिल्ह्याचे रामटेक व काटोल असे दोन भाग केले. रामटेकची जबाबदारी राऊत तर काटोलची जबाबदारी कुंभारे यांच्याकडे दिली आहे. काटोलमध्ये काटोल, सावनेर आणि हिंगणा असे तीन मतदारसंघ येतात. यात साधारणत: जिल्हा परिषदेचे २६ सर्कल येतील.
या सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार जिंकून येतील, असा आमचा प्रयत्न राहील. मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सावनेर मतदारसंघातून भाजपचे डॉ. आशिष देशमुख २६ हजार मतांनी निवडून आले. त्यामुळे काँग्रेसला माझा फटका विधानसभेतच बसला आहे आणि आता आगामी जिल्हा परिषदेतही तो बसणार असल्याचा दावा कुंभारे यांनी केला.
Centre of Indian trade unions : देशभरातील कामगारांचा श्रम संहितेच्या विरोधात एल्गार!
ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्ताने भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे. या अंतर्गत आज, शुक्रवार, दि. १६ मे रोजी कामठी येथील जयस्तंभ चौकात जिल्हा स्तरीय तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ही यात्रा काढण्यात येईल व त्याला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule उपस्थित राहतील, असे राऊत यांनी सांगितले.