Breaking

BJP Internal politics : आमदार प्रकाश भारसाकळेंच्या विरोधात रोष

Party members seeking MLA Prakash Bharsakale’s resignation : कार्यकर्त्यांनी पक्षाकडे केली निलंबनाची मागणी

Akola विधानसभा निवडणुकांनंतरही पक्षांतर्गत वाद संपलेले नाहीत. अकोला जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत कलहाने पुन्हा डोके वर काढले आहे. अकोटमधील ११ पदाधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे भाजप नेते आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही निलंबित करण्याची मागणी उचल खाण्यास सुरुवात झाली आहे.

दर्यापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या प्रचाराऐवजी भारसाकळे यांनी अपक्ष उमेदवार बुंदेले यांना पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मंगेश चिखले यांनी यासंदर्भातील पुरावे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर सादर केले आहेत. या घटनांमुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर अधिक तीव्र झाला आहे.

MLA Nitin Deshmukh : निधी वितरणात पक्षपातीपणा, आमदारांचा उपोषणाचा इशारा

काँग्रेसने पक्षविरोधी वर्तनाबद्दल आमदार सुलभा खोडके यांना सहा वर्षांसाठी निलंबित करून पक्षधोरणांप्रती ठाम भूमिका घेतली होती. मात्र, भाजपने आमदार भारसाकळे यांच्यावर तत्काळ कारवाई केली नाही. तर पक्षावर दबाव असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पक्षनिष्ठतेचे उदाहरण कायम ठेवण्यासाठी भाजपने ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे, अन्यथा कार्यकर्त्यांमधील नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपपुढे दोन पर्याय आहे. एकतर भारसाकळे यांच्यावर कारवाई करणे. आणि पक्षाचे ध्येयधोरण आणि निष्ठा प्रस्थापित करण्यासाठी कठोर निर्णय घेणे. दुसरे म्हणजे मंगेश चिखले यांची समजूत काढणे. अंतर्गत वाद मिटवून कार्यकर्त्यांमध्ये एकजूट राखणे.

Nagpur police : दोन हत्याकांडांनी हादरली उपराजधानी

भाजपने भारसाकळे यांच्यावर कारवाई केली नाही. तर पक्षातील गटबाजी अधिक वाढेल आणि पक्षधोरणांबद्दल संभ्रम निर्माण होईल. हा निर्णय येत्या प्रजासत्ताक दिनाच्या आधी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या विषयावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.