Pankaja Munde’s Janata Darbar will begin at the BJP office in Mumbai : २२ एप्रिलपासून पंकजा मुंडेंच्या जनता दरबाराने होणार सुरवात
Mumbai : प्रदेश भाजपच्यावतीने प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्यात येणार आहे. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार घेणार आहेत. पहिला जनता दरबार घेण्याचा मान येत्या २२ एप्रिल रोजी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना मिळाला आहे.
जनता दरबाराला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रदेश भाजपाकडून दर महिन्याला एक दिवस प्रत्येक मंत्री महोदयांचा ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याचा पहिला मान राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आला आहे.
Devendra Fadanvis : अमरावतीत काही चांगलं झालं की माझ्या आईला आनंद होतो !
येत्या मंगळवारी म्हणजे २२ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ४.३० या दरम्यान भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे त्या जनता दरबार घेणार आहेत. या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यांतील व भागातील संबंधित मंत्री महोदयांच्या विभागांतर्गत येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता आपल्या भागातील कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाच्या दोन प्रती घेऊन २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रदेश कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे कळवण्यात आले आहे.
Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे जळकं लाकूड, अधुनमधून धूर निघतो !
कार्यकर्त्यांनी एक आगाऊ निवेदनाची प्रत bjpmaha@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविल्यास त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करणे व ती प्रत त्या विभागाकडे पाठविणे सोयीचे होईल, असे प्रदेश कार्यालयाने म्हटले आहे. या जनता दरबारचा राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा. प्रत्यक्ष उपस्थित राहून मंत्री महोदयांकडून आपल्या भागातील विकासाची कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने जनता दरबारची आपणास मदत होईल, असा विश्वास भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.