BJP Minister’s today in Akola : सक्रिय सदस्यता संघटन कार्यशाळेला हजेरी
Akola भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय सदस्यता संघटन कार्यशाळेसाठी आज अकोल्यात भाजपच्या तीन मंत्र्यांचा ताफा दाखल झाला आहे. राज्याचे कामगार मंत्री व पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके हे तिघेही विविध कार्यक्रमांसाठी अकोला दौऱ्यावर आले आहेत.
राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे आज सकाळी ९.१५ वाजता अकोल्यात आगमन झाले. त्यानंतर हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे भाजपच्या सक्रिय सदस्यता संघटन कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेनंतर ते पुढील कार्यक्रमांसाठी खामगावकडे रवाना होतील.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या हद्दीतील ग्रामपंचायतीत ६० लाखांचा घोटाळा!
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील अकोल्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर ते हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे संघटन कार्यशाळेला हजेरी लावणार आहेत. कार्यशाळेनंतर ते दुपारी २.१५ वाजता विमानतळावरून नागपूरकडे रवाना होतील.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे सकाळी ९.१५ वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यानंतर ते भाजपच्या कार्यशाळेला उपस्थित राहिले. दुपारनंतर ते विश्रामगृहात काही बैठकांना उपस्थित राहतील आणि २.३० वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
Crime in Nagpur : बलात्काराचा प्रयत्न; महिलांनी झोडपून काढले
भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी आयोजित या कार्यशाळेस भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती राहणार आहे. तीन मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे अकोल्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.