Breaking

BJP Membership : गोंदिया भाजपवर राज्यातील नेते खुश!

Party leaders happy with Gondia BJP performance : सदस्य नोंदणी अभियानाची मोहीम जोरात

Gondia भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देण्यात आले आहे. यात विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यात उत्साहात काम सुरू आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याबद्दल राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी जिल्हा भाजपचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाले. त्यानंतर सरकार दुप्पट वेगाने विकासाच्या दृष्टिकोनावर काम करत आहे. भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे भाजपमध्ये नवीन सदस्य जोडण्यासाठी पक्षाने राज्यात भाजप सदस्यता मोहीम सुरू केली आहे.

Sanjay Rathod : पोहरादेवीत पाच दिवसांचा बंजारा महोत्सव

या सदस्यता मोहिमेअंतर्गत, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गोंदिया विधानसभा मतदारसंघाने भाजप सदस्यता मोहिमेच्या विदर्भातील यादीत टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले.

Jitendra on Nitin Gadkari : जितेंद्र म्हणाले, गडकरींनी बोलावले म्हणून, नाहीतर बहाणा केला असता !

 

गोंदिया विधानसभा मतदारसंघाला ७२ हजार २०० सदस्य बनवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ज्यामध्ये भाजपच्या सर्व आघाडीने सक्रियता दाखवत ५३ हजार ४९ सदस्यांना पक्षात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आणि राज्या विदर्भातील यादीत गोंदिया मतदारसंघ टॉप 10 वर आला आहे. इतक्या मोठ्या संख्येने सदस्यांना सामील करून घेतल्याबद्दल पक्षाने कार्यकर्त्यांचे कौतुक आणि सम्मान केलं.

नागपुरात आयोजित सत्कार समारंभात भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चौहान आणि उपेंद्र कोठेकर यांनी गोंदिया मतदारसंघ क्षेत्राचे कार्यकर्त्यांच्या अभिनंदन केले.