BJP MLAs threatened by Prahar goons complatint to the superintendent of police : भाजपची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार
Prahar माजी आमदार बच्चू कडू व अचलपूरचे विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. आमदार तायडे यांच्या विरोधात प्रहारने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता भाजपनेही आमदार तायडे यांच्या जीविताला प्रहारच्या गावगुंडांकडून धोका असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. प्रहारच्या संस्थापक अध्यक्षांच्या आदेशावरून त्यांचे गावगुंड कार्यकर्ते आमदार तायडे यांच्यावर हल्ला करतील. त्यांचा अपघात घडवून आणण्याची शक्यताही टाळता येत नाही. म्हणून त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे अचलपूर शहराध्यक्ष कुंदन यादव, अचलपूर तालुकाध्यक्ष विशाल काकड व चांदूरबाजार तालुकाध्यक्ष मुरली माकोडे यांनी केली.
Randhir Sawarkar, Ranjit Patil : श्रेयवादाच्या राजकीय ‘नाट्या’वर पडदा पडणार?
सोशल मीडियावर आमदार प्रवीण तायडे यांच्याविरोधात शिवीगाळ व अश्लील भाषेचा वापर केला जात आहे. त्यांची बदनामी व मानहानी प्रहारचे पराभूत आमदार व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गेल्या 29, 30 डिसेंबरच्या मध्यरात्री बहिरम यात्रेमध्ये आमदार प्रवीण तायडे यांचे छायाचित्र असलेल्या बॅनरवर थुंकले. तसेच काही बॅनर फाडण्याचा प्रकारही प्रहार कार्यकर्त्यांनी केला. त्याबाबत शिरजगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजप कार्यकर्ते आक्रमक
प्रहारकडून आमदार प्रवीण तायडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात धाव घेत घोषणाबाजी केली. ‘जय श्रीराम’चे नारे देखील लागले. कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांच्या दालनात शिरण्याचा प्रयत्न केला.
Bhandara Guardian Minister : डॉ. परिणय फुके ठरवणार भंडाऱ्याचा पालकमंत्री ?
परिस्थितीवर नियंत्रण
कार्यालयाच्या आवारात पाय ठेवायला जागा उरली नसल्याने अखेर आरसीपीने मोर्चा सांभाळला. कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाठवले. गाडगेनगरचे ठाणेदार ब्रह्म गिरी, ग्रामीणचे होम डीवायएसपी अर्जुन ठोसरे व विशेष शाखाप्रमुख सतीश पाटील यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.