Politics heated up in Khamgaon city over the underground passage : खामगाव शहरात भूयारी मार्गावरून राजकारण तापले
Khamgao शहरातील रेल्वे स्टेशनजवळ सुरू केलेले भूयारी मार्गाचे काम तब्बल सहा महिन्यांपासून रखडले आहे. या कामामुळे नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या विषयावर आता राजकारण पेटले असून सत्ताधारी भाजप व विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट समोरासमोर आले आहेत.
भूयारी मार्गाचे काम थांबल्याने रस्ता पूर्ववत करून रेल्वेगेट सुरू करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी भाजप नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र रोहणकार यांनी १९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले असून, भाजप पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची भूमिका ऐकून घेतली. महारेलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, शनिवारी पुन्हा बैठकीचे आश्वासन देण्यात आले आहे.
DPC Meeting of Buldhana : दुहेरी नेतृत्वाने विकासाला गती मिळणार?, डीपीसी बैठक २५ ला
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने देखील या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. समन्वय नगर, हरीफैल, जिया कॉलनी व तायडे कॉलनी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संतोष तायडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की भूयारी मार्ग तात्काळ बुजवला नाही, तर त्याठिकाणी साचलेल्या पाण्यात उड्या घेऊन सोमवारी अभिनव आंदोलन करण्यात येईल.
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी संपाचा इशारा; ग्रामीण भागाचा संपर्क तुटण्याची भीती
भूयारी मार्गामुळे नागरिकांना १ ते २ किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. रुग्णवाहिका, विद्यार्थी, व्यापारी, दुकानदार यांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात पाणी साचून हा मार्ग धोकादायक ठरतो. त्यामुळे व्यापाऱ्यांची दुकाने बंद पडली असून उपासमारीची वेळ आली आहे.
Bacchu Kadu : नेत्यांची ‘तोडफोडी’ची भाषा, शेतकरी आंदोलन चर्चेत
या प्रश्नावर भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याने खामगावमध्ये राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजप आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने थेट पाण्यात उडी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या वादाला कोणते राजकीय स्वरूप येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.