Breaking

BJP Politics : बडगुजरांचा ताफा मुंबईकडे रवाना, प्रवेश होणार की अडवला जाणार? संभ्रम कायम !

BJP state president Chandrashekhar Bawankule’s big statement about Sudhakar Badgujar’s entry into the party : सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल बावनकुळेंनीही स्पष्टच सांगितलं !

Nagpur : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून काहीच दिवसांपूर्वी हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यांच्यासोबत इतर डझनभर नेतेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आश्चर्य म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबद्दल काहीच माहिती नाही. कारण याबाबत आज (ता. १७ जून) पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल माझ्याकडे कुठलीही माहिती नाही, असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान सुधाकर बडगुजर यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. पण त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार की अडवला जाणार, याबाबत संभ्रम अद्यापही कायम आहे.

याच संभ्रमाच्या वातावरणात महसूल मंत्री बावनकुळे यासंदर्भात म्हणाले की, स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदारांचे एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाहीत. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या प्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि अचानक त्यांच्यासोबत काम करावे लागले, तर फरक पडतोच आणि निवडणुकीला आता फक्त सहा महिने झाले आहेत. त्यामुळे विरोधाची भावना असणे साहजिक आहे. महसूल मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.

Eknath Shinde Shiv Sena : विदर्भातील शिंदेसेनेत असंतोष; नियुक्त्यांवरील वाद चिघळला

बडगुजर यांच्यासोबत बबनराव घोलप आणि काँग्रेस व इतर पक्षांतीलही डझनभर माजी पदाधिकारी आणि नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात विचारले असता, बबनराव घोलप यांच्यासंदर्भातही माझ्याशी अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. मुंबईत गेल्यानंतर यासंदर्भात चर्चा झाली तर हा विषय पुढे जाईल. मात्र आतापर्यंत यासंदर्भात माझ्याकडे कुठलीही माहिती नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Vidarbha Farmers : तर राज्यकर्त्यांना आपली घरं सांभाळणे कठीण होईल!

एकीकडे सुधाकर बडगुजर यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला. इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की, मला याबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे बडगुजरांच्या प्रवेशाचे होणार काय, हा प्रश्न राजकीय वर्तुळाच चर्चिला जात आहे. त्यामुळे बडगुजरांचा ताफा अडवला जाणार की, त्यांचा पक्षप्रवेश होणार, यावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.