The Thackeray brothers’ equation increased the excitement : ठाकरे बंधूंच्या समीकरणाने वाढवली खळबळ
Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून, “150 पार”चा नारा देत त्यांनी लढाईचा बिगुल फुंकला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री तडकाफडकी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केंद्र आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर भाजप आता मुंबईत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजपकडून सुमारे 150 जागांवर उमेदवार उतरवण्याची आखणी सुरू असून, शिंदे गटाला 64 ते 75 जागा देण्याची तयारी असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या पारंपरिक गडांमध्ये मतांची फाटाफूट झाल्यास त्याचा फायदा घेण्यासाठी भाजप सूक्ष्म पातळीवर संघटनात्मक तयारी करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि ठाकरे गट यांच्यातील समन्वयाच्या कमतरतेचा फायदा मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठरवले आहे.
Bangladeshi infiltrators : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार !
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटीमुळे राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे ‘ठाकरे ब्रँड’ला नवी उभारी मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. जर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले, तर त्याचा थेट फटका भाजप-शिंदे युतीला बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाजपने “150 पार”चा नारा दिल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने चर्चा अधिक रंगल्या आहेत. शिंदेंच्या या दौऱ्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Anil Deshmukh : संजय राऊत यांचे नाव कोंढाळीच्या यादीत आलेच पाहिजे !
राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना मुंबई महापालिका निवडणूक हे केवळ महानगराचे नव्हे, तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय नकाशाचे केंद्रबिंदू ठरणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.








