Board Exam : वडिलांच्या मृतदेहाला नमस्कार करून मुलगा गेला दहावीच्या पेपरला!

Father passed away, but the son did not miss 10th exam : आदेशने मनावर दगड ठेवून उचलले पाऊल

Gondia स्वतःचं दुःख विसरून मुलांना सुख देणारी व्यक्ती म्हणजे बाप असते. आपल्या अंगावर फाटके कपडे असले तरीही चालतील, मुलांना काही कमी पडायला नको, असा विचार बाप करत असतो. मात्र गोंदिया जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मुलाची दहावीची परीक्षा सुरू आहे आणि त्यातच वडिलांचं निधन झालं. पण मुलानं खचून न जाता वडिलांच्या मृतदेहाला नमस्कार केला. आणि परीक्षा केंद्रावर पोहोचला. या घटनेनंतर मुलाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ठाणेश्वर कटरे यांचे शुक्रवारी (दि.२१) पहाटे निधन झाले. ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा आदेश यंदा दहावीत. त्याचा पहिलाच पेपर होता. अशातच आदेशच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरात वडिलांचा मृतदेह असताना पेपर द्यायला जायचे कसे असा प्रश्न त्याच्यासमोर होता. पण आदेशने मनावर दगड ठेवत वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवले.

Siddharth Kharat, Sanjay Raimulkar : आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर!

केंद्रावर जाऊन परीक्षा दिली. पेपर दिल्यानंतर घरी पोहोचत वडिलांवर अंत्यसंस्कार केले. या प्रसंगाचे गावकरी साक्षीदार झाले. आदेशला परीक्षा देण्यासाठी शिक्षक रमेश बिसेन व क्षत्रिय पवार समाज संघटनेचे सचिव मोरेश्वर चौधरी यांनी प्रोत्साहन दिले.

गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश ठाणेश्वर कटरे हा हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षण घेत आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. अशात आदेशची शिक्षणासाठी धडपड सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आदेशच्या वडिलांचे निधन झाले. शुक्रवारपासूनच दहावीची परीक्षा सुरू झाली. आदेशचा आज पहिला पेपर होता. यात त्याची पेपरची तयारी सुरू होती. मात्र, सकाळी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने कटरे यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले.

सकाळी ११ वाजता आदेशचा पेपर होता. अशात पेपर द्यायला जायचे की नाही असा पेच त्याच्यासमोर निर्माण झाला. मात्र, त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने त्याला धीर दिला. यानंतर आदेशने मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर दिला. एकीकडे घरात वडिलांचा मृतदेह, तर दुसरीकडे मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर आदेशच्या हातात मराठीचा पेपर अशा द्विधा मन:स्थितीत त्याने पेपर दिला.

Shweta Mahale : आमदार श्वेता महाले यांना धमकी; चिखलीत रास्ता रोको

या घटनेची माहिती मिळताच मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र चौरागडे, माजी सरपंच धृवराज पटले व इतर ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांनी मोहाडी येथील दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट दिली. यावेळी आदेश कटरे याची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले.