Those who copy in exams will go directly to jail : कॉपीमुक्त अभियान जोरात; कॉपीसाठी मदत करणाऱ्यावरही गुन्हा
Wardha महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली. यात ‘कॉपी करा आणि तुरुंगाची हवा खा’ अशाच पद्धतीची योजना सरकारने आणली आहे.
विद्यार्थी कॉपी करताना पकडला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सोबतच कॉपीला सहकार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, शांततेने पेपर सोडवावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शाळांत कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दिले आहेत.
Radhakrushna Vikhe-Patil : सत्ता नाही म्हणून कुणी प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नव्हते!
११ फेब्रुवारीपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याच्या सूचना जिल्ह्यात दिल्या आहेत. मात्र बारावीच्या पहिल्याच पेपरला जिल्ह्यात दोन विद्यार्थी काॅपी करताना आढळल्याने तातडीने पर्यवेक्षकांवरही कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा होणार आहे. या संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह एमसीव्हीसी, बायफोकल अशा विषयांची परीक्षा होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा १७ मार्चपर्यंत राहणार आहे. या संदर्भात बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले आहे. कोणत्या विषयाची, केव्हा पेपर आहे हे दिलेले आहे.
CM Devendra Fadnavis : जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने!
बहुतांश विद्यार्थी हॉल तिकीट विसरत नाहीत. सेंटरवर विद्यार्थ्यांची माहिती फोटोसह उपलब्ध असते. परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण असते. त्यात हॉल तिकीट जर विसरले तर अशावेळी त्यांनी घाबरून जाऊ नये. त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार आहे. मात्र, त्याच्याकडून हमीपत्र घेत दुसऱ्या दिवशी हॉल तिकीट त्याला आणावे लागेल.
विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विद्यार्थी कॉपी करताना आढळला तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही. त्या विद्यार्थ्याला पुढची परीक्षा देता येईल. त्यापूर्वी त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली जाईल. तो दोषी आढळल्यास एक किंवा दोन परीक्षेपासून त्याला वंचित राहावे लागेल.