Vaishali Jamdar remanded in police custody for two days : दोन वर्षात वाटल्या २११ बोगस शालार्थ आयडी
Nagpur : नागपूर विभागीय उपसंचालक म्हणून कार्यरत असताना आपल्या कार्यकाळात २०२१ ते २०२३ दरम्यान वैशाली जामदार यांनी तब्बल २११ बोगस शालार्थ आयडी तयार केल्या आणि वाटल्या. जामदार यांच्या कार्यकाळात लक्ष्मण मंघाम उपसंचालक कार्यालयात कार्यरत होता. त्याच्या सोबतीने जामदार यांनी हा कारनामा केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यातून त्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही सांगण्यात आले आहे.
वैशाली जामदार यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. २३) अटक केली होती. त्यानंतर काल (ता. २४) त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात गुरुवारी (ता. २२) तत्कालिन प्रादेशिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनाही अटक करण्यात आली. सायबर पोलिसांनी बनावट शालार्थ आयडींचा तपास केला. या तांत्रिक तपासात अनेकांनी आपआपल्या कार्यकाळात बनावट आयडी तयार केल्याचे समोर आले आहे.
Rural Maharashtra : पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना आजही गाठावा लागतो लांबचा पल्ला !
चितामण वंजारींवर निलंबनाची तलवार..
प्रभारी उपसंचालक आणि नागपूर जिल्हा परिषदेचे तत्कालिन प्रादेशिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी हे आधीच अटकेत आहेत. आता त्यांच्यावर निलंबनाची तलवार लटकली आहे. लवकरच त्यांचे निलंबन होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. वंजारी हे प्रथम श्रेणी अधिकारी आहेत. त्यामुळे आयुक्तालयामार्फत त्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर त्यांचे निलंबन होईल आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर होणार असल्याचे यंत्रणेतील लोकांनी सांगितले.