dispute continues between Bhondekar and fuke : शिंदेंचे विश्वासू भोंडेकर अन् फडणवीसांचे खास फुकेंमध्ये वाद सुरूच
Bhandara : भंडारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू परिणय फुके यांच्या दरम्यान वादाची ठिणगी पडली आहे.परिणय फुकेंनी शिंदे सेनेतून तोडफोड करण्यापेक्षा भाजप वाढवण्यावर फोकस करावा. असा इशाराच भोंडेकरांनी दिला आहे. सत्तेत एकत्र असलेल्या मित्र पक्षातील वाद कार्यकर्त्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
गेल्या काही दिवसात भंडारा जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, आणि त्यामुळेच भंडारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू परिणय फुके यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. फुकेंना भंडाऱ्याचं राजकारण समजण्यासाठी बराच वेळ लागेल असा टोलाही भोंडेकरांनी लगावला आहे.
परिणय फुकेंनी शिंदे सेनेतून तोडफोड करण्यापेक्षा भाजप वाढवण्यावर फोकस करावा. भंडाऱ्यात भाजपचे तीन आमदार आणि एक खासदार होता आज एकही नाही. फुके यांना विधान परिषदेत निवडून देण्यासाठी मी मतदान केले होते. मात्र, मी निवडून येण्यासाठी फुकेंनी एक तरी सभा घेतली असेल तर सांगावे. मी त्यांच्या भरवश्यावर निवडून आलेला नाही, ही सर्व खळबळजनक वक्तव्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भोंडेकर यांनी भाजपचे आमदार फुके यांच्या बाबत केले आहेत.याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे
Uddhav Thackeray : ‘त्या’ मंत्र्याला भर रस्त्यात चाबकाने फोडला पाहिजे !
भंडारा जिल्ह्यात मित्र पक्षांमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणासंदर्भात भोंडेकर सध्या चांगलेच भडकलेले आहेत. आणि त्यांनी थेट परिणय फुके यांच्या राजकीय समजूतदारीवर प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी फुके यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यामुळेच भंडाऱ्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या सोबत जावं लागल्याचा स्पष्टीकरण ही भोंडेकरांनी दिले आहे.
विधानसभेची निवडणूक मी आपल्याच बळावर लढलो, कोणी काम केले, कोणी नाही हे मला चांगलेच ठावूक आहे. मला अधिक बोलायला लावू नका असे सांगून भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर सहकारी बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्याशी युती केल्यानंतर परिणय फुके यांनी नरेंद्र भोंडेकर महायुतीत आहेत, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत कोणाच्या भरोशावर निवडून आले याचा विसर पडला असल्याचे म्हटलं आहे.
___