A laborer’s daughter rose to the rank of Assistant Engineer : सहायक अभियंता पदापर्यंत मारली मजल
Gondia Bondgaondevi मनाशी पक्का निर्धार केला तर कुठल्याही परिस्थितीत यशाला गवसणी घालता येते. आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमीपेक्षा कष्टाला अधिक महत्त्व असते. विपरित परिस्थितीत यश प्राप्त करणाऱ्यांचं समाजात विशेष कौतुक होते. अशाच कौतुकाला एका मजुराची मुलगी पात्र ठरली आहे. वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्याच्या मुलीने सहायक अभियंता पदापर्यंत मजल मारली आहे.
शिल्पा गुलाब धारगावे असे त्या तरुणीचे नाव आहे. ती सहायक अभियंता पदावर रुजू झाली आहे. दृढ निश्चय, जिद्द, इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश संपादन करता येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अपयश आले तर खचून जाऊन नका, प्रयत्नात सातत्य ठेवा निश्चित यश मिळते, असा सल्ला शिल्पाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
Bahujan samaj party: बसपाच्या नेत्याचे आवाहन, डुप्लिकेट नेत्यांपासून सावध रहा
शिल्पाचे दहावीपर्यंतचे शिक्षण मानवता विद्यालय बोंडगावदेवी येथे झाले. घरात अठराविश्व दारिद्र्य होते. आई विटभट्टीवर मजुरी करायची. परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे शिक्षण चान्ना बाक्टी येथे झाले. मावशी रत्नमाला रामचंद्र हुमणे यांच्याकडे ती राहायची.
Republic Day Parade : चिल्हाटीच्या सरपंचांना दिल्लीचं निमंत्रण!
मेहनतीच्या जोरावर तिने पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले. येथेच ती थांबली नाही. तर उच्च शिक्षणाची ओढ असल्याने जिद्दीने तिने अमरावती येथे विद्युत अभियंता पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने नोकरीचा शोध घेतला. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद येथे टेक्निकल ऑफिसर म्हणून काम केले. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द तिला थांबू देत नव्हती.
पुढे तिने सरकारी नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला अपयश आले; पण ती खचली नाही. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. नुकत्याच जाहीर झालेल्या महावितरणच्या परीक्षेत शिल्पाची सहायक अभियंतापदी निवड झाली. तिच्या नियुक्तीचा कुटुंबीयासह गावकऱ्यांनी सुध्दा आनंद व्यक्त केला. शिल्पाने यशाचे श्रेय आई रमा, वडील गुलाब धारगावे, रामचंद्र हुमने व रत्नमाला हुमने यांना दिले.